लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा करीत असताना खेडगाव खुर्द, ता. भडगाव येथील सुनील यशवंत हिरे यांना नुकतेच वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्या फाउंडेशनतर्फे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी ४ जुलै रोजी वीरपिता यशवंत हिरे यांच्या नावाचा ६५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
या वेळी अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, औरंगाबाद येथील अभियंता शिरीष महाजन, संस्थेचे सचिव डॉ. राहुल महाले यांच्यासह शहीद सुनील यांचे वडील, आई, पत्नी, भाऊ आणि दोन मुले उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी कुटुंबीयांना भविष्यातदेखील मदतीची ग्वाही दिली.
फोटो क्रमांक - ०५ सीटीआर १४
फोटो कॅप्शन - शहीद सुनील हिरे यांच्या कुटुंबीयांना ६५ हजारांचा धनादेश देताना डॉ. धर्मेंद्र पाटील, सचिव डॉ. राहुल महाले, शिरीष महाजन, विवेक पाटील.