शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

जळगावात तलाठ्यांना धक्का देत वाळू चोर ट्रॅक्टर घेऊन पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:43 PM

नशिराबादलाही दोन ट्रॅक्टर पकडले

जळगाव/नशिराबाद : आव्हाणे शिवारात गिरणा नदी पात्रातून वाळू चोरांवर कारवाईसाठी नियुक्त महसूल विभागाच्या पथकातील तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना धक्का मारून व त्यांच्या मोटरसायकलची चावी बळजबरीने काढून घेत वाळू घेऊन जात असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने धुम ठोकल्या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. तर वाघूर नदी पात्रातून वाळू चोरून नेत असलेल्या दोन ट्रॅक्टर चालकांना नशिराबाद पोलीसांनी ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले.या संदर्भात तालुका पोलिसांकडे तक्रारीत म्हटले आहे की, नशिराबाद तलाठी प्रवीण मधुकर बेंडाळे व त्यांचे सहकारी वनराज बुधा पाटील, अमोल विक्रम पाटील, लक्ष्मीकांत वसंत बाविस्कर हे आव्हाणे शिवारात गिरणा नदी पात्राजवळ सकाळी १२ वाजेच्या दरम्यान गस्त घालत होते. या भागात हे कर्मचारी मोटसायकलने फिरत असताना त्यांना गिरणा नदी पात्राच्या दिशेने एक ट्रॅक्टर येताना दिसले. लाल रंगाचे ट्रॅक्टरने निळ्या रंगाच्या ट्रालीत वाळू घेऊन जात होते. ट्रॅक्टरवर नंबर नव्हता तर ट्रालीवर एम.एच. १९ ई. ५३९ असा नंबर होता. चारही जणांनी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत ट्रॅक्टर थांबविले. दोन्ही मोटरसायकल बाजुला लावून चौघांनी ट्रॅक्टर चालकास नाव विचारले असता त्या आपले नाव श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी रा. आव्हाणे असे सांगितले. अमोल पाटील यांनी ट्रॉलीवर चढून पाहीले असता त्यात ३ हजार रूपये किंमतीची वाळू असल्याचे लक्षात आले.धक्का मारून ठोकली धुमतहसील पथकातील कर्मचाºयांनी ट्रॅक्टर चालक श्रीराम चौधरी याला ट्रॅक्टर तहसीलला घेऊन चल असे सांगितले असता तो खाली उतरला. लघवी करण्याच्या बहाण्याने तो दोन्ही मोटरसायकल लावल्या होत्या त्या बाजुने गेला. दोन्ही गाड्यांच्या चाव्या काढून घेत तो पुन्हा ट्रॅक्टरच्या दिशेने आला. काही समजायच्या आत पथकातील दोघांची गचांडी पकडून त्यांना जोरदार धक्का मारून तो ट्रॅक्टरवर चढला व तेथून धुम ठोकली. याप्रकणी नशिराबाद तलाठी प्रवीण बेंडाळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशनला टॅक्टर चालक श्रीराम चौधरीविरूद्ध भादवि कलम ३७९ व ३५३ व खनिजे अधिनियम १९५७ चे कलम २२ जमीन महसुल अधिनियमाच्या कलम ४८ प्रमाणे (७) (८) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.नशिराबादलाही दोन ट्रॅक्टर पकडलेजळगाव खुर्द शिवारातील वाघुर नदीपात्रातून दोन ब्रास वाळु उपसा करून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे घेऊन जाणारे विना नंबरचे दोन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने खंडोबा मंदीराजवळ पकडले. याप्रकरणी चालक दिलीप सुरेश कोळी, मालक संदीन ज्ञानदेव कोळी (दोघे रा. जळगाव खुर्द), दुसºया ट्रॅक्टरवरील चालक सचिन दिलीप ठाकरे, मालक भागवत कोळी (रा. सुनसगाव) यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पत्र नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.बागूल यांनी तहसिलदारांना दिले आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेले दोन्ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी लावण्यात आले.यांचा होता पथकात समावेशनशिराबाद येथील कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सतीश पाटील, किरण हिवराळे, युनुस शेख, रवींद्र इंधाटे, राजू साळुंखे, गुलाब माळी यांनी ही कारवाई केली.परवाना नसताना वाहतूकट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी वाळू उपसा करण्याचा व वाहतुकीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्यांनी परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही वाहतूक अवैध असल्याचेच पोलिसांच्या लक्षात आले. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. बागुल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई केली जावी म्हणून एस.ए. बागुल यांनी तहसीलदार अमोल निकम यांना पत्र देऊन कळविले आहे.पळून जाताना ट्रक्टर चालकाने दुचाकीचा प्लग व चाव्या घेऊन पळ काढल्याने त्याचा पाठलागही पथकाला करता आला नाही.नशिराबाद येथील पोलिसांनी दोन ट्रॅक्टर पकडून आमच्या ताब्यात दिले आहे. या दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल नाही मात्र प्रत्येकाकडून १ लाख २० हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे.-अमोल निकम, तहसीलदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव