जळगाव : निराधार, वृद्ध, अंध, अपंग, घटस्फोटित महिला यांना अर्थसाहाय्य मिळावे याउद्देशाने शासनाकडून संजय गांधी निराधार योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक लाभार्थींना अर्थसाहाय्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. थेट लाभ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटवर ही रक्कम जमा होते. यात टपाल विभागाचा समावेश आहे. या विभागाच्या यंत्रणेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे अर्थसाहाय्य लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे तहसील गोविंद शिंदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता सांगितले. आणि या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच ही अडचण दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून दूर करण्यात आली असून लाभार्थ्यांना अनुदान वाटप योग्य पद्धतीने केले जात असल्याचेदेखील तहसीलदार शिंदे म्हणाले.
मदतीपासून लाभार्थी वंचीत
By admin | Published: September 08, 2015 5:28 PM