पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी वितरीत केले व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा एक हात दिला. यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.संतोषी माता नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या १५८ आहे. पैकी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १११ विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश उपलब्ध झाले. त्यामुळे ४७ विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. यासाठी स्थानिक सोशल माध्यमावर गणवेशासाठी मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. संवेदनशीलता मन दाखवून सरपंच नीता पाटील व सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील या दाम्पत्याने स्वखर्चाने गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याचे वितरण नीता पाटील, रामेश्वर पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट व उपसरंपच श्यामराव सावळे यांच्या हस्ते शाळेत करण्यात आले.यावेळी शालेय समीती अध्यक्ष निगुर्णा महाजन, अॅड.एस.आर.पाटील, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, भाजप तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, शरद पांढरे, रवींद्र मोरे, संदीप बेढे, केंद्रप्रमुख भानुदास वानखेडे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, भारत पाटील, अशोक सुरवाडे, उत्तम पवार, शरद बेलपत्रे, ज्ञानेश्वर पवार, बन्सी तायडे, राजेंद्र धुळसंधीर, गयास तडवी, सचिन कुमावत, दिनेश गाडे यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी, पालक उपस्थित होते.
पहूर येथे जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 3:57 PM
गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी वितरीत केले व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा एक हात दिला.
ठळक मुद्दे१५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ४७ विद्यार्थ्यांसाठी गणवेश वितरितपालकांनी व्यक्त केले समाधान