यावल, जि.जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथे सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन न्यायाधिश डी.जी.जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी न्यायाधिश जगताप यांनी सिकलसेल आजाराकडे गंभीर लक्ष देण्याची गरज असून, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजाराची लक्षणे व त्यावरील नियंत्रणासाठी जनजागृती करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.सिकलसेल आजार व त्यावरील नियंत्रणाच्या जनजागृतीसाठी येथील महाविद्यालयीन युवक-युवती व साने गुरूजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आजार व नियंत्रणविषयक घोषणा दिल्या. कार्यशाळेत तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी सिकलसेल आजार म्हणजे काय? आजाराचे निदान व उपचार पध्दतीबाबत सविस्तर माहिती दिली.तालुका समन्वयक सुहास कुळकर्णी यांनी सफरर व वाहक रुग्णांंची व त्यासंबंधीच्या शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यकमास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोेज पाटील, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रशेखर साळुंके, साने गुरूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघ, क्षयरोगतज्ज्ञ नरेंद्र तायडे उपस्थित होते.
यावल येथे सिकलसेल नियंत्रणावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 7:29 PM
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत यावल येथे सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमसिकलसेल आजार गंभीर, त्याकडे लक्ष देणे गरजेचेजनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी