जळगाव : प्रेम आंधळ असतं. त्यात जात, पात, धर्म व वय याचे कशाचेच बंधन नसते, असे म्हटले जाते. अनेक तरुण-तरुणींचे प्रेमप्रकरण घडलेल बहरले आहे. जळगाव शहरात मात्र एक धक्कादायकच प्रेमप्रकरण समोर आले आहे. ते तरुण-तरुणींचे नसून समलिंगी प्रेमातून घर सोडलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींचे आहे. दोघींचे वय १७ आहे.एकाच ठिकाणी राहून एकमेकाविषयी जिव्हाळा, प्रेम वाढले आणि त्यातून दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरुन थेट लग्नापर्यंतचा निर्णय घेऊन दोघांनी घरातून पलायन केले आहे. दरम्यान, दोघा मुलींच्या कुटुंबियांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. रामानंदनगर पोलिसांनी दोन्ही मुलींसह एका तृतीयपंथीयाला यावल तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेतले आहे. दिवसभराच्या नाट्यातून सोमवारी सायंकाळी दोघींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत या दोघी मुली एकमेकांच्या शेजारी राहतात. सोबत राहून एका मुलाला ज्याप्रमाणे मुलीबद्दल आकर्षण होते, तसेच दोघींमध्ये प्रेमाचे आकर्षण. कुटुंबिय दोघींच्या समलिंग प्रेमसंबंधातील लग्नाला तयार होणार नाहीत. कुटुंबियांना समजले त्याचे परिणाम वाईट होतील, म्हणून दोघींनी लग्नाचा निर्णय घेतला. एका तृतीयपंथीयाच्या मदतीने ४ रोजी दोघींनी पलायन करुन यावल तालुक्यातील एक गाव गाठले.तृतीयपंथीय असल्यावरुन एकीची तपासणीदोन्ही अल्पवयीन मुलींमधली एक मुलगी ही तृतीयपंथी असल्याचा संशय स्थानिक रहिवासी व पोलिसांना आला होता. कारण तिची राहणीमान व लक्षणे जरा वेगळेच होते.त्यामुळे महिला पोलिसांनी रुग्णालयात तरुणीची शारीरिक तपासणी केली असता तसा काही प्रकार नसल्याचे निदर्शनास आले.विनंती केल्याने दोघींना सोडायला गेलोमुलींना दुचाकीवरुन घेवून जातांना काही रहिवाशांनी तृतीयपंथीयाला शनिवारी रात्री बघितले होते. याबाबत पोलिसांनी तृतीयपंथीयाची विचारपूस केली असता, त्याने मला दोन्ही मुलींनी विनंती केली म्हणून मी त्यांना सोडायला गेल्याचे तृतीयपंथीयाने सांगितले. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी व रिपाईचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी तृतीयपंथीयांना या परिसरात वास्तव्य करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले आहे.कपडे घ्यायला घरी आली आणि बोंब फुटली...घरुन पळून गेलेली दोन्ही मुली शनिवारी रात्रभर यावल तालुक्यात राहिल्या. रविवारी सकाळी त्यातील एक मुलगी जळगावला घरी कपडे घेण्यासाठी आली. एक दिवस घराबाहेर होती, अन आता पुन्हा घरी आल्यावर मुलगी कपडे भरुन कुठे जात आहे, म्हणून कुटुंबियाने तिच्याकडे विचारणा केली, मात्र तिने सांगायचे टाळले. शंका व गुंता वाढल्याने कुटुंबियांनी मुलीच्या कानशिलात लगावली, अन् तिने प्रेमकहाणी सांगितली. ही कहाणी ऐकून कुटुंब थक्कच झाले. त्यांनी मुलीला घेत रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी कहाणी ऐकून पोलिसही आवाक झाले. पोलिसांनी तत्काळ दखल घेत कुटुंबिय तसेच मुलीसह यावल तालुक्यातील गाव गाठले. याठिकाणाहून सोमवारी तृतीयपंथीय व दुसऱ्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. शेवटी सायंकाळी त्यांना समजूत घालण्यात यश आले.
अहो,आश्चर्यम ! दोन मुलीच पडल्या प्रेमात; लग्नासाठी केले दोघांनी घरातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:18 PM