लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग कायम असून मंगळवारी २९६ नवे कोरेानाबाधित आढळून आले आहे. चार बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, २४० रुग्ण बरे झाले असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २६७२ वर पोहोचली आहे. जळगाव ग्रामीणमध्येही ४४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात सर्वच भागात कोरोचा फैलाव झाला आहे. शहरात मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या २७ हजार १६१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ४३३ वर पोहोचली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये मंगळवारी २ बाधितांचा मृत्यू झाला.
असे आहेत रुग्ण
एकूण सक्रिय रुग्ण ११८२१
लक्षणे असलेेले रुग्ण ३४४९
लक्षणे नसलेले रुग्ण ८३७२
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण १७४८
अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण ६८९
कोरोना बाधितांचे मृत्यू थांबेना
कोरोना बाधितांचे मृत्यू थांबतच नसल्याचे गंभीर चित्र कायम आहे. मंगळवारी पुन्हा १८ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात एक २८ वर्षीय व ३७ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. जळगाव शहर, जामनेर तालुका प्रत्येकी ४, चाळीसगाव , जळगाव ग्रामीण, रावेर प्रत्येकी २, चोपडा, भुसावळ, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात अचानक रुग्णवाढ
मंगळवारी ११४३ नवीन रुग्ण आढळून आले असून १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील २८ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. जळगाव शहरात २९६ तर मुक्ताईनगरात अचानक रुग्णवाढ समोर आली आहे. मुक्ताईनगरात १९७ रुग्ण आढळून आले आहेत.