जळगाव : कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करुन नाशिक जिल्ह्यातून शिवाजी नगरात आल्यानंतर त्याची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली व आरोग्य तपासणीही केली नाही म्हणून शेख अनीस शेख चांद (रा.शिवाजी नगर) व शेख अलतिया आसीफ पटेल (रा.इस्लामपूर, विचंूर, ता.निफाड, जि.नाशिक) या दोघांविरुध्द बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शिवाजी नगरात मनपाच्या दवाखान्याजवळ नाशिक जिल्ह्यातून काही व्यक्ती वास्तव्यास आले आहेत व त्यांनी कोणतीही आरोग्य तपासणी केली नाही अशी माहिती मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी आरोग्य अधिकारी विकास पाटील यांना खात्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी पाठविले असता तेथे शेख अलतिया आसीफ पटेल (रा.इस्लामपूर, विचंूर, ता.निफाड, जि.नाशिक) हे आलेले होते. त्यांनी ही माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली होती. विकास पाटील यांनी घटनास्थळीच पोलिसांना पाचारण केले व दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.
बाहेर जिल्ह्यातून आल्याची माहिती लपविली; दोघांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:10 PM