आॅनलाईन लोकमतजळगाव दि. ८ :- चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील मौजे उपखेड जवळील साकुर ता. मालेगाव येथे उपद्रवी बिबट्याने ७ वा बळी घेतल्याने वरखेडे, उपखेडे तसेच साकुर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. या परिसरात दवंडी पिटवून ग्रामस्थांना रात्री-अपरात्री एकटे न फिरण्याचा तसेच रात्री घराबाहेर न झोपण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले.वनविभागाच्या अधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. गावागावांत लाऊड स्पिकर असलेली वाहने फिरवून जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्याबाधीत क्षेत्रात ठिकठिकाणी मानवी मनोरे (मचान) लावण्यात येवून दुर्बीण, कॅमेरे तसेच बंदूक इ. साधनांसह मचानावर पथकांना दबा धरुन बसविण्यात आले.साकुर व उपखेड परिसरात नाशिक वनवृत्त व धुळे वनवृत्त मधील कर्मचारी व अधिकाºयांनी संयुक्तरित्या सकाळी ५ वाजेपर्यंत बिबट्याची शोध मोहिम सुरु ठेवली होती. उपद्रवी बिबट्याचा शोध घेण्यासाठी पुणे तसेच बोरीवली येथील सुसज्ज पथके मागविण्यात आली आहेत.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी धुळे येथील एसआरपीएफची एक तुकडी मिळविण्यासाठी वरीष्ठस्तरावरुन पाठपुरावा करण्यात येत आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवुन २५ करण्यात आली आहे. तसेच ५ ठिकाणी पिंजरे (ट्रॅप केजेस) व तीन ठिकाणी मानवी मनोरे उभारण्यात आलेले आहेत.दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी वरखेड खुर्द येथील मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर साकुर गावात ते भेट देणार आहेत.
सात बळी घेणाऱ्या बिबट्याच्या उपद्रवामुळे चाळीसगाव वनक्षेत्रात हायअलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:56 PM
नागरीकांनी रात्री घराबाहेर न झोपण्याचे वनविभागाने केले आवाहन
ठळक मुद्दे५ ठिकाणी पिंजरे व ३ ठिकाणी मानवी मनोरेपुणे तसेच बोरीवली येथील सुसज्ज पथके दाखलवनविभागातर्फे गावांमध्ये जनजागृती