जळगाव : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर हाय अलर्ट करण्यात आला आहे. मंगळवारी स्टेशनावर श्वान पथकाद्वारे संपूर्ण स्टेशन परिसर व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
भुसावळ स्टेशन प्रमाणे जळगाव रेल्वे स्टेशनही जंक्शन असल्याने या ठिकाणी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या सर्व फ्लॅट फार्मवर शस्त्रधारी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच तिकीट आरक्षित प्रवाशानांच स्टेशनात सोडण्यात येत आहे. प्रवाशांना कुठल्याही संशयित वस्तूला हात न लावता, पोलिसांना सतर्क करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपणाद्वारे करण्यात येत आहे. नव्या वर्षांच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवर व गाड्यांमध्येही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जळगाव रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनी दिली.