लोकमत न्यूज नेटवर्क
आनंद सुरवाडे
जळगाव : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शनिवारी प्रथमच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८ टक्क्यांवर पोहोचले आहे. पहिली लाट ओसरत असतानाही हा दर ९७.९ टक्केच नोंदविण्यात आला होता. दुसरीकडे सक्रिय रुग्ण संख्येचाही दोनही लाटेतील शनिवारी निच्चांक नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून नवीन रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक असे चित्र आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मृत्यूही घटले असून दुसरी लाट ओसरत असताना हे दिलासादायक चित्र समोर आले आहे. शनिवारी जिल्हाभरात १६ रुग्ण आढळून आले असून २२ रुग्ण बरे देखील झाले आहेत. एकही मृत्यू नसून सक्रिय रुग्णांची संख्या आता २८० वर पोहोचली आहे. यात जळगाव शहरात ४ बाधित आढळून आले असून ४ रुग्ण बरेही झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी ४३ वर कायम आहे. यासह चाळीसगावात सर्वाधिक ७ बाधित आढळून आले आहेत.
पहिली लाट
रुग्ण : ५७७१५
मृत्यू : १३६७
बरे झालेले : ५५८५५
सर्वाधिक रिकव्हरी रेट : ९७.९
सर्वात कमी सक्रिय रुग्ण : ३११
दुसरी लाट
रुग्ण : ८४७३२
मृत्यू : १२०७
बरे झालेले : ८३७३८
एकूण सर्वाधिक रिकव्हरी रेट : ९८ टक्के
सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या : २८०
असा वाढला रिकव्हरी रेट
१ मे : ८९.६५ टक्के
१५ मे : ९१. ०३ टक्के
१ जून : ९४. ५१ टक्के
१५ जून : ९६.९७ टक्के
१ जुलै : ९७.७६ टक्के
१० जुलै : ९८ टक्के