जळगाव : सोमवारी एका दिवसातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला़ शहरात तब्बल १५४ कोरोना बाधित आढळून आले़ असून एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे़ तपासण्यांची संख्याही वाढविण्यात आली असून शासकीय तंत्रनिकेतनला सोमवारी ३९० जणांची तपासणी करण्यात आली़ रविवार ४५० चाचण्या करण्यात आल्या होत्या़शहरातील रुग्णसंख्या ३६९७ झाली आहे़ यात २६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़ त्यात १२४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९७० रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात पाच मृत्यूची नोंद असून यात जळगाव शहर १, तालुका १, चाळीसगाव २, एरंडोल १ मृत्यू झाला आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारे मृत्यू कमी झाले असून सोमवारी एका मृत्यूची नोंद आहे़या भागात आढळले रुग्णमुक्ताईनगर ५, शाहूनगर ४, जोशीपेठ २, पिंप्राळा २, भोईटे नगर २, दादावाडी २, सरस्वतीनगर २ यासह भिकमचंद जैन नगर, कोल्हे नगर, वाघनगर, पोलीस लाईन, गायत्रीनगर, गणेशनगर, आेंकारेश्वरनगर, शिवाजीनगर, सम्राट कॉलनी, अहुजानगर आदी भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़
शहरात रुग्णसंख्येचा उच्चांक, १५४ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:39 PM