जळगाव : शहरात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तापमानाचा कहरदेखील वाढत जात आहे. गुरुवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सीअस होते. यामुळे संपूर्ण राज्यात सर्वात उष्ण शहर म्हणून जळगाव पहिल्या क्रमांकावर तर देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये जळगाव तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यातच आठवडाभरात तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंशाचा पारा ही पार करेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शहराचा पारा यंदा स्थिर व जास्त आहे. दरवर्षी मे महिन्यात कमाल तापमानाची सरासरी ही ४२ ते ४३ अंशाची सरासरी इतकी असते. मात्र, यंदा ही सरासरी मे अखेरपर्यंत ४३ ते ४४ अंश इतकी होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे व सूर्याचे पडणाºया लंबरूप किरणांमुळे जळगाव परिसरासह मध्यप्रदेशातील खरगौन, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा दरवर्षी जास्त असतो. मात्र, यंदा तापमान हे कोरडे असल्याने तापमानाचा पारा वाढला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.दोन दिवस पावसाचा अंदाजएकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे मध्यप्रदेश, महाराष्टÑ व कर्नाटक भागात तयार झालेल्या कोमोरीन क्षेत्रामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाट व विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, वाºयाचाही वेग ताशी ४० किमी वेगाने राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.तब्बल महिनाभरापासून पारा ४० च्या वरदरवर्षी उन्हाळ्यात तापमानाचा पारा रेकॉर्डब्रेक असतो, मात्र त्यासोबतच शहराच्या तापमानात चढ-उतार पहायला मिळत असतो. यंदा मात्र तापमानात कोणताही चढ-उतार पहायला मिळत नसून, १० एप्रिल पासून तापमानाने ४० अंश पार केल्यानंतर तब्बल महिनाभरापासून तापमानाचा पारा ४० अंशापेक्षा जास्तच राहिला आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून पारा ४३ अंशावर स्थिर आहे. कोरोनाच्या भीतीनेजाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे नागरिक घराबाहेर निघत नसले तरी आता नागरिकांना कोरोनासोबतच उन्हाचीही भीती वाटत आहे.
राज्यात सर्वाधिक तापमानाची शहरात झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:45 PM