जळगाव, दि. 3- मु.जे.महाविद्यालयातील भुगोल विभागातर्फे छतावर खान्देशातील खगोलप्रेमी व विद्याथ्र्याना आकाश निरीक्षणासाठी उपयोगी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दुर्बिण बसविण्यात आली आहे. ही दुर्बिण तैवान देशातील जी.एस.ओ.कंपनीकडून खरेदी केली असून ती सर्वासाठी विनामूल्य उपलब्ध केली आहे.
मू.जे.महाविद्यालयातील नविन विज्ञान इमारतीच्या छतावर ही दुर्बिण बसविली आहे. या दुर्बिणीचे उद्घाटन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खगोल अभ्यासक अमोघ जोशी आणि इम्रान तडवी यांचे व्याख्यान झाले. विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ.जे.एन.चौधरी, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. कल्पना नंदनवार, भुगोल विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा जंगले, मराठी विज्ञान परिषदेचे दीपक तांबोळी, मोहन कुलकर्णी, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
शहरातील सर्वात मोठी दुर्बिण
जळगाव शहरातील आकाश निरीक्षणासाठी असलेली ही सर्वात मोठी दुर्बिण असून तिचा व्यास 12 इंच आणि उंची पाच फुट इतकी आहे. या दुर्बिणचा लाभ शालेय विद्याथ्र्याना देखील घेता येणार असल्याची माहिती भुगोल विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा जंगले यांनी दिली.