ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप झाला. या महोत्सवादरम्यान विद्याथ्र्यानी विविध कला सादर करून तसेच स्पर्धामधून भरीव यश मिळविले. बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रवीण पाटील, इकबाल मिङरा, जिल्हा संरक्षण अधिकारी आरती साळुंखे, मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, दिपाली देवरे, आसिफ पठाण अक्षय सोनवणे, राहुल पाटील उपस्थित होते. यावेळी बालगृहातील तसेच शालेय गटातील विजेत्या विद्याथ्र्याना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी खेळाडू व कलावंतांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन परिविक्षा अधिकारी जयश्री पाटील यांनी केले तर परिविक्षा अधिकारी सारिका मेतकर यांनी आभार मानले. जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या वानखेडे, शोभा हंडोरे, विद्या सोनार, साजिद पठाण, डॉ. विजय पाटील यांनी सहकार्य केले.
विविध स्पर्धाचा निकाल असा
- लांब उडी : मोठा गट मुली - दुर्गा कासार, मनिषा रायमळे, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - राहुल आहिरे, सचिन आहिरे, शासकीय बालगृहलहान गट मुली - नेहा कोळी, राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. लहान गट मुले - सुनील सुरवाडे मुलांचे बालगृह शेलवड. चेतन चौधरी, मुलांचे बालगृह वेले.
- गोळाफेक : मोठा गट मुली - शुभांगी रायमळे, मोनिका रळे, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले- सचिन आहिरे, शासकीय बालगृह वाक. आकाश सपकाळे, मुलांचे बालगृह शेलवड. लहान गट मुली - ललिता कोळी, शीतल तायडे, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - दीपक चौधरी, मुलांचे बालगृह वाक; चेतन चौधरी, मुलांचे बालगृह वेले.
- थाळीफेक : मोठा गट मुली - शुभांगी रायमळे, पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - सोनू पवार, प्रेमचंद पाटील, मुलांचे बालगृह, वेले. लहान गट मुली - शीतल तायडे, ललिता कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - दीपक चौधरी, मुलांचे बालगृह वाक, ऋषिकेश भावसार, मुलांचे बालगृह शेलवड.
- 100 मी. धावणे :मोठा गट मुली - पूजा कोळी, दुर्गा कासार, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - राहुल आहिरे, मुलांचे बालगृह वाक, गजानन जाधव, मुलांचे बालगृह जळगाव. लहान गट मुली - ललिता कोळी, मुलींचे बालगृह जळगाव, राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. लहान गट मुले - कार्तिक बेलेकर, मुलांचे बालगृह शेलवड, रोहित पाटील, मुलांचे बालगृह खडके बु.
- 200 मी. धावणे मोठा गट मुली -शुभांगी रायमळे, पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - राहुल आहिरे मुलांचे बालगृह वाक, भूषण रौंदे, मुलांचे बालगृह शेलवड. लहान गट मुली - राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. दिपाली हटकर, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - शेखर कोळी, ललित नेवे, मुलांचे बालगृह वेले. - क्रिकेट : विजेते- शासकीय मुलांचे बालगृह वाक. उपविजेता - मुलांचे बालगृह वेले.
- सांस्कृतिक कार्यक्रम नाटय़ स्पर्धा - विजेते - मुलींचे बालगृह जळगाव. पारंपरिक नृत्य स्पर्धा - प्रथम - लीलाई मुलांचे बालगृह (पावरी गीत) द्वितीय - मुलांचे बालगृह खडके बु. (भिलाऊ गीत) लावणी - प्रथम - साक्षी दाभाडे, मुलींचे बालगृह जळगाव. सोलोडान्स - प्रथम - शबनम शेख, मुलींचे बालगृह खडके बु.
सामुहिक नृत्य : लहान गट मुले - प्रथम - लीलाई मुलांचे बालगृह जळगाव, द्वितीय - मुलांचे बालगृह खडके बु., लहान गट मुली- प्रथम - मुलींचे बालगृह खडके बु. मोठा गट मुले - प्रथम - शासकीय बालगृह वाक, द्वितीय - मुलांचे बालगृह जळगाव. मोठा गट मुली - प्रथम - मुलींचे बालगृह जळगाव.
- निबंध स्पर्धा : लहान गट मुले - प्रथम - प्रदीप महाले, मुलांचे बालगृह शेलवड, द्वितीय - शरद कोळी, मुलांचे बालगृह खडके बु.
- हस्ताक्षर स्पर्धा : लहान गट मुले - प्रथम - गौरव ढवळे, लीलाई मुलांचे बालगृह, मुली प्रथम - पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव.
फोटो कॅप्शन - विजेत्यांसमवेत डावीकडून हर्षाली पाटील, एस. आर. पाटील, रमेश काटकर, इकबाल मिङरा, प्रवीण पाटील, दिपाली देवरे, सुरेश आर्दिवाल, राहुल पाटील, अक्षय सोनवणे. आदी.