जळगाव : अपघातांचे प्रमाण टळावे व झालेल्या अपघातात वाहनधारकाचा जीव जावू नये यासाठी महामार्ग व जिल्ह्यातील सर्व राज्य मार्गावर येत्या दहा तारखेपासून हेल्मेट व सीट बेल्ट सक्ती करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी घेतला आहे. हेल्मेट व सीट बेल्ट बाबत गेल्या दोन दिवसापासून शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात तर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे.या निर्णयाची अमलबजावणी जनतेत करण्यापूर्वी पोलिसांपासूनच त्याची सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग व राज्यमार्गावर विना हेल्मेट व विना सीट बेल्टची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियमभंग करणा:या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या कारवाईपासून महसूल मिळविणे हा उद्देश नसून वाहनधारकांचा जीव वाचावा हाच प्रमुख उद्देश या मोहीमेमागील आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, विविध कंपन्यामध्ये जावून जनजागृती केली जात आहे. जनतेने या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही जनचळवळ म्हणून पुढे यावी अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी व्यक्त केली आहे.
महामार्ग व राज्यमार्गावर उद्यापासून सक्ती
By admin | Published: February 09, 2017 12:27 AM