जळगाव : महामार्गावर कुठेही अपघात झाला तर त्या ठिकाणी तातडीने पोहचून जखमींचा जीव वाचविण्यासाठी ह्यहायवे मृत्यूंजय दूतह्ण ही योजना १ मार्चपासून राज्यभर सुरु करण्यात आली. पाळधी येथील महामार्ग पोलीस केंद्रात सोमवारी या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. परिसरातील गावे तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना प्रथमोपचार किट व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून ह्यहायवे मृत्यूंजय दूतह्ण योजना सुरु करण्यात आली. धरणगावचे नायब तहसीलदार .लक्ष्मण सातपुते यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, डॉ.जितेंद्र जैन, तलाठी बालाजी लोंढे,मौलाना आझाद संस्थेचे फिरोज शेख आदी उपस्थित होते.
हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबत उपस्थितांना महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी सुनील मेढे यांनी योजना कशी राबविण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती देवून योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता मदत आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. मेढे यांच्यासह हेमंत महाडीक, प्रदीप ननवरे, पंकज बडगुजर, दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन वसिम मलिक यांनी केले.