मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून घराकडे स्थलांतर करणाºया परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाºया वाहनांची महामार्गावर शनिवारी रात्रीपासून मोठी वर्दळ वाढली आहे. अगदी पायी, सायकल, दुचाकी चारचाकी आणि माल वाहतूक करणाºया ट्रक मधून परप्रांतीय मजूर घरांकडे निघाले आहेत.कोरोना संकटात तब्बल दीड महिन्यापासून लॉकडाउनमध्ये मुंबई महानगरी पूर्णपणे थांबली आहे. अशात जेवणापासून तर झोपण्यासाठी जागा मिळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत संकटाचा सामना करणाºया परपरप्रांतीय मजुरांना कोरोना संक्रमणाचा धाक दिवसागणिक वाढत होता तर रेल्वे व रस्ते मार्ग बंद असल्याने मुंबईबाहेर पडून आपले राज्य आपले घर गाठण्याची धावपड आणि संघर्ष मोठा होता.उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यातील मजुरांनी तिसरे लॉकडाउन सुरू होताच २४ एप्रिलपासून पायी प्रवास सुरू केला आहे. यानंतर मजुरांसाठीच्या रेल्वे गाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष आणि पोलिसांचे फटके पडूनही जागा मिळाली नाही. म्हणून ऐपत नसलेले मजूर सायकल खरेदी करून प्रवासात निघाले तर ऐपतदारानी मोटारसायकल आणि भाडोत्री चारचाकीने घराकडील प्रवास सुरू केला आहे तर शनिवारी सायंकाळपासून माल वाहू ट्रकमध्ये मजूर आपापल्या राज्यात रवाना होत आहे.मुक्ताईनगरवरून छत्तीस गड, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तरांचलकडे जाणारे मार्ग मुक्ताईनगर येथील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून मध्य प्रदेशातून पुढे जातात तर काही मार्ग नागपूरकडून वळतात. यामुळे मुंबई-नागपूर महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात जात आहेत.
महामार्गावर परप्रांतात जाणाऱ्या मजुरांच्या वाहनांची वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:22 PM