भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने विचारही केला नव्हता की, तिचे जीवन एकदा पुनश्च बहरेल. तिच्या अनाथ बाळाला मोईन रूपाने नाथ मिळेल व ती घटस्फोटित व बाळाची आई असताना तिला तरुण पती मिळेल.मोहम्मदिया नगरातील रहिवासी असलेला मोईन शेख तरुणाचा विवाह झालेला नव्हता. आपल्यापेक्षा वयाने मोठी तसेच सहा वर्षाचा बाळ असतानासुद्धा मोइन शेखने हिनाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले व आपल्या पालकांना होकार कळविला.वडील नईम शेख, त्यांचे काका पापा कालू व रफिक कालू यांनी हिनाचे आई व काका यांच्याशी बोलणी केली. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा शुक्रवारी संपूर्ण जगात वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांचे जीवन चरित्र आपल्या जीवनात आणण्याची प्रत्येक मुस्लिम समाजाच्या तरुणांनी प्रार्थना केली वास्तविक पाहता अंतिम प्रेषित यांचा सुद्धा पहिला विवाह आपल्या वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या व विधवा असलेल्या हजरत खतीजा सोबत झालेला होता हीच परंपरा मोइनने कायम ठेवत आपल्याशी वयाने मोठी असलेल्या व सहा वर्षाचा बाळ रिजवानसोबत जीवन जगत असलेल्या घटस्फोटितेसोबत विवाह केले.खुत ब ए निकाह हाफिज रईस यांनी यांनी पठण केले तर या विवाहासाठी हिनातर्फे वकील म्हणून शौकत मजीद शेख यांनी व मोईन, वधूतर्फे साक्षीदार म्हणून इम्तियाज शेख व युसुफ बागवान यांनी भूमिका निभावली.या विवाह समारंभात सर्व प्रमुख व प्रतिष्टीत व्यक्तींची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने हिनातर्फे तिचे भाऊ पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शेख, वकार शेख, शेख हसन, चिनावलचे माजी सरपंच कलीम डेप्युटी, साजिद शेख, तसलीम पठाण, अजीम हाजी, सैय्यद पोस्ट मास्टर, वारीस खान, वाहिद खान, ईल्यास शाह, गुफारान शेख आदी उपस्थित होते.
हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 1:15 AM
भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने ...
ठळक मुद्दे भुसावळ येथे झालेला अनोखा विवाह सोहळाया विवाह समारंभात सर्व प्रमुख व्यक्तींची उपस्थिती