भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे रविवारी चक्क हिंदू समाज बांधवांनी मौला पंजतन घोडेपीर बाबा यांची सलग तिसºया वर्षी संदल मिरवणूक काढून एकात्मतेचे दर्शन घडवले.साकेगाव येथे काळा मारुती मंदिराजवळील रहिवासी असलेले बाळू तुकाराम कुंभार हे पंजतन मौला घोडेपीर बाबांचे निस्सीम भक्त आहेत. ते संदल मिरवणूक काढण्यात त्यांचा पुढाकार असतो. गेल्या तीन वर्षांपासून बाबांची संदल मिरवणूक गावातून काढण्यात येत आहे. आजही त्यांनी ही मिरवणूक काढली. त्यांना सिंधी कुमार, विनोद परदेशी, अनिल भद्रा, किशोर चौधरी, उखा भगत, मनीष सिंधी, अशोक खंडेलवाल, शिव कुमार, कन्हैया भोई, शहा साबीर, मुसा शहा, मंजूर खाटीक, दीपक कुंभार, धर्मराज मराठे, संदीप भोई, गजानन पवार, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, पिंटू पाटील, राजू पाटील, संदीप चौधरी, बाळू भाई हे सहकार्य करतात,.घोडा बग्गीवर भव्य संदल मिरवणूकहिंदू समाज बांधवांनी विद्युत रोषणाईने सजवलेल्या घोडा बगीवर संपूर्ण गावातून संदल मिरवणूक काढली व गावाजवळच तिघ्रे येथे पंजतन मौला घोडे पिर बाबांच्या समाधीजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात ९० टक्के हिंदू व सिंधी समाज बांधवांनी सहभाग घेतला.
साकेगाव येथे हिंदू समाज बांधवांनी काढली पंजतन मौला घोडे पिर बाबांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 10:30 PM
साकेगाव येथे रविवारी चक्क हिंदू समाज बांधवांनी मौला पंजतन घोडेपीर बाबा यांची सलग तिसºया वर्षी संदल मिरवणूक काढून एकात्मतेचे दर्शन घडवले.
ठळक मुद्देघडविले एकात्मतेचे संदेशबाळू तुकाराम कुंभार हे पंजतन मौला घोडेपीर बाबांचे निस्सीम भक्तसलग तिसऱ्या वर्षी संदल काढली मिरवणूक