अमळनेर : ऐतिहासिक दगडी दरवाजाचा एक बुरुज कोसळलयांनातर तात्पुरत्या लावलेल्या मातीच्या गोण्या देखील पडून आल्याने मुख्य मार्गावरील धोका निर्माण झाला आहे अनेकवेळा मागणी करूनही आणि वृत्त प्रसिद्ध करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
2 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गोण्या पडल्याने अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे 3 जुलै रोजी दगडी दरवाज्याच्या बुरुज कोसळला होता मात्र हा दरवाजा पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय त्याला हात लावता येत नाही , पूर्ण पाडता येत नाही पुरातत्व विभागाच्या तत्कालीन सहा संचालक डॉ विराग सोनटक्के व विद्यमान सहा संचालक यांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला असून देखील निधी मिळत नसल्याने तात्पुरत्या गोण्या लावून आधार लावण्यात आला होता मात्र निमुळत्या जागेवर असल्याने वाहनांच्या गर्दीत त्या गोण्या देखील कोसळण्याची भीती असल्याची शक्यता लोकमत ने प्रसिद्ध केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यायी वाहतूक सुरू न झाल्याने अखेर जे नको होते ते घडलेच सुदैवाने लॉक डाऊन असल्याने वाहतूक मर्यादित होती घटनास्थळी आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील , प्रांताधिकारी सीमा आहिरे , मुख्ययाधिकारी विद्या गायकवाड यांनी भेट देऊन तातडीची बैठक बोलावली आहे