चोपडा / बिडगाव - होळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरल्या जाणाºया भोंगºया बाजाराचे वेध सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये लागले असून चोपडा, यावल तालुक्यातील गावे या बाजारासाठी सज्ज झाली आहे. आदिवासी बांधवांना होळीचे वेध लागले असून ‘हमरा भोंग-या आयो रे भाया...’ असा सूर कानी पडण्यास सुरुवात झाली आहे.सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाºया भोंगºया बाजाराची रेलचेल तालुक्यात होळीला सुरू होते. तत्पूर्वी होळीच्या काही दिवस आधी भोंगºया बाजाराला प्रारंभ होतो. आदिवासी बांधवांसाठी भोंगºया बाजाराचा आनंद द्विगुणीत करण्याचे एक आगळ-वेगळे ठिकाण असते. होळीचे पांग फेडण्यासाठी आदिवासी सज्ज झाला आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मध्य प्रदेशच्या बºहाणपूर पासून ते गुजरातच्या सीमेपर्यंत अगदी गाव वाड्या-वस्त्यांवर आदिवासी पावरा समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. या समाजात होळी या सणास अन्यसाधारण महत्व असून होळी सणाच्या आधी या उत्सवाचे पर्वणी ठरणाºया भोंगºया बाजाराला गुरुवार, १४ मार्चपासून सुरूवात होत आहे.आदिवासी संस्कृतीचे दर्शनसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बहुतांशी आदिवासी समाजाचा शेती व मजुरी हा मूळ व्यवसाय आहे. गरिबीत जगणारा हा समाज आजही रूढी, परंपरा, सण उत्सव पारंपारीक पध्दतीने साजरा करून आपली आगळी वेगळी संस्कृती टिकवून आहे. आदिवासी समाज बांधव वर्षभर कामानिमित्त मोलमजुरीसाठी कुठेही गेले असले तरी होळीच्या सणानिमित्त आपल्या गावाकडे भोंगºया उत्सवासाठी येतात. भोंगºया बाजारात वर्षभरासाठी लागणाºया वस्तू, नवीन कपडे, दाळ्या, फुटाणे, खजूर असे विविध वस्तू खरेदी करतात. तसेच आपल्या पारंपारीक वेशभुषेत मोठ-मोठ्या ढोल, थाली, बासरीच्या तालावर आदिवासी संस्कृतीची दर्शन घडवितात. यात बहारदार समूहनृत्य सादर करतात. होळीच्या आधीच्या पौर्णिमेपासूनलाखो रूपयांची उलाढालभोंगºया निमित्त आदिवासी बांधव तयारीला लागतात. होळीच्या आधीचा सप्ताह पूर्ण सातपुड्यातील धवली, कर्जाणा, वैजापूर, गेरूघाटी, तसेच अडावद, आदिवासी भागातील बºयाच गावांमध्ये भोंगºया बाजार भरतो. परंतु तालुक्यात सर्वात मोठा भोंगºया बाजार म्हणून वैजापूर येथे भरतो. याठिकाणी लाखो आदिवासी बांधव एकत्र येवून मोठ्याप्रमाणावर पारंपारीक वेशभुषेत विविध रंगातील पेहराव, मोरपीसाचा मुकुट परीधान करून नृत्य करीत आनंदात उत्सव साजरा करतात व लाखो रूपयांची उलाढाल याठिकाणी होते.आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने जुने पारंपारीक वेशभूषा कालबाह्य होताना दिसत आहे. त्याजागी तरूण रंगबेरंगी भडक कपडे परिधान करून भोंगºयात सहभागी होत आहे.या ठिकाणी भरणार भोंगºया बाजारहोळीच्या आठ दिवस आधी दररोज परिसरातील मध्यभागी असलेल्या गावांना किंवा आठवडे बाजाराच्या ठिकाणी हा भोंगºया बाजार भरत असतो. यावर्षी १४ रोजी गुरूवारपासून सुरू होणारा हा बाजार बलवाडी, १५ रोजी यावल व वरला, १६ रोजी वैजापूर व वाघझिरा, १७ रोजी कुंड्यापाणी, कर्जा$ना व चोपडा, १८ रोजी अडावद, १९ रोजी वरगव्हान, झामटी, किनगाव व २० रोजी धौली व शेवरे येथे भरणार आहेत.हार कंगन, फुटाण्याचा प्रसादया बाजारात आदिवासी बांधव आपल्या पारंपारीक वेशभुषा करीत बैलगाडीने बाजारात हजर होऊन आपआपल्या ढोल ताशांसह स्री, पुरूष, तरूण-तरूणी, वृध्द बेधुंद नाचून आपला आनंद साजरा करीत हार कंगन, फुटाण्याचा प्रसाद वाटप करतात.उत्साह घेऊन आला भोंग-याया बाजारात उत्कृष्ठ ढोल वाजवण्याची स्पर्धाही लागतात व आदिवासी बोलीभाषेत गाणे म्हणून उत्साह वाढविला जातो. एकूणच पिढ्यांपिढ्या आदिवासी संस्कृतीचे जतन करत तिचे दर्शन करून देणारा भोंगºया बाजार उत्साह घेऊन आला आहे.भोंग-यावर दुष्काळाचे सावटयावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिक-पाणी नाही. तसेच मोलमजुरी नसल्याने आदिवासी बांधवाच्या भोंगºया बाजारावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. ज्याटिकाणी आजूबाजूच्या वस्ती, पाड्यातून भोंगºयासाठी लाखो लोक जमायचे त्याठिकाणी चाळीस-पन्नास हजारावर आदिवासी बांधव दिसत आहे. दिवाळी पेक्षाही मोठा समजला जाणारा होळी, भोंगºया बाजाराचा उत्सव आदिवासी समाजाची संस्कृतीची जतन व्हावी यासाठी मोठ्या आनंदात व उत्साहात आदिवासी बांधव भोंगºया बाजार साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘हमरो भोंगऱ्या देखने आवजो रे भाया....’ : आजपासून भोंगऱ्या बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:40 PM