जळगाव : कोळी समाजबांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या समस्या सहा महिन्यात सोडविण्याचे आश्वासन भाजपातर्फे मागील विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या भाजपाच्या जाहीरनाम्याची आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे मंगळवार, १८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरकारने आदिवासी समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने सरकारच्या निषेधार्थ मंगळवार, १८ डिसेंबर रोजी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हाप्रमुख मोहन शंखपाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगावात भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:50 PM
आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या भाजपाच्या जाहीरनाम्याची आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे मंगळवार, १८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
ठळक मुद्देआदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे शासनाला इशाराजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन