अनेक कर्मचाऱ्यांची दांडी : उशीर होऊनही निवांतपणे कामकाजाला सुरुवात
डमी
एकूण कर्मचारी - २५६
रजेवर असलेले - ५८
वेळेवर हजर - १२६
लेटलतीफ - ७२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ख्रिसमससह सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी विकेण्डला जोडून एक-दोन दिवस रजा टाकून टुरवर जाऊन सुट्या इन्जॉय केल्या, तर तीन अनेक कर्मचारी तीन दिवसांच्या सलग सुटीनंतर कामावर हजर झाले. मात्र, अनेक कर्मचारी
कार्यालयीन वेळेनंतरच मनपात दाखल झाले. तर अनेकांना उशीर होऊनही निवांतपणेच कामकाजाला सुरुवात केल्याचे आढळून आले.
त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सुटीनंतरही मनपा कर्मचाऱ्यांचा सुटीचा ‘फील’ कमी झालेला नसल्याचेच दिसून आले. डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवडा दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहलीचाच झाला आहे. त्यातच यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे
काही महिने नागरिकांना घराबाहेर निघता आले नाही, तर घराबाहेर निघाल्यानंतर पर्यटनाला जाता आले नाही. डिसेंबर महिना लागल्यानंतर सर्वच पर्यटनस्थळेदेखील आता उघडू लागली आहेत. त्यातच शुक्रवारी ख्रिसमसची सुटी व लागून शनिवार, रविवारची सुटी आल्यामुळे
शासकीय कर्मचाऱ्यांनी काही दिवस रजा टाकून पूर्ण आठवडाच वर्षअखेर साजरा करण्यासाठी राखीव ठेवल्याचेच चित्र शासकीय कार्यालयात पहायला मिळाले.
मनपा कर्मचाऱ्यांचा सुटीचा मुड उतरेना
मनपामध्ये प्रभाग समिती १ व किरकोळ वसुली विभाग सोडल्यास अन्य विभागांत कर्मचारी सुटीवर आढळून आले, तर अनेकजण कार्यालयात उशिरानेच दाखल झाले होते. आरोग्य, बांधकाम, अस्थापना, नगररचना या सर्व विभागांतील अनेक कर्मचारी सोमवारीही रजेवर
होते. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा सुटीचा मुड उतरत नसल्याचे आढळून आले.
अधिकारी मात्र वेळेतच दाखल
मनपातील कर्मचाऱ्यांचा सुटीचा मुड जरी उतरला नसला तरी मनपा अधिकारी मात्र सोमवारीही वेळेवरच मनपात हजर झाले होते. आयुक्त
सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, प्रशांत पाटील हेदेखील सोमवारी मनपातच ठाण मांडून होते. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी फाइलींचा
निपटारादेखील केला.
कोट..
विभागप्रमुख कारवाई करतील
जे कर्मचारी उशिरा कामावर आले. त्या कर्मचाऱ्यांबाबतीत संबंधित विभागाचे विभागप्रमुखच कारवाई करतील. प्रत्येक कर्मचाऱ्याने वेळेवर कार्यालयात येणे आवश्यक आहे.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा