जळगाव : सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत मद्य घरपोच देण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. त्यानुसार विदेशी मद्याचे ठोक विक्रेते सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत देशी मद्याचे ठोक विक्रेते सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर परवाना कक्ष विदेशी मद्याचे किरकोळ विक्रेते व देशी मद्याचे किरकोळ विक्रेते यांना सोमवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुविधा देता येईल यासाठी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
तसेच जे परवाना कक्ष लॉजिंग निवास कक्षाशी संलग्न आहेत त्यांना त्यांच्या संकुलाअंतर्गत निवासी असलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास मद्यविक्री दुकानात भेट देता येणार नाही. या विक्रेत्यांव्यतिरिक्त इतर सर्व मद्यविक्री दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.