जळगाव : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ च्यावर घरफोड्या झालेल्या आहेत. रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हददीतील उच्चभू अशा पटेल नगरात प्रवीणचंद्र दिनाभाई पटेल यांच्या घरातून चोरट्यांनी ८५ हजाराची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रवीणचंद्र पटेल ६ ते ८ आॅगस्ट दरम्यान बाहेरगावी गेले होते. शनिवारी ते घरी परतले असता बंद घराचे कुलुप तोडून कपाटातील ८५ हजाराची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोमवारी त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ तपास करीत आहेत.पोळ्याला गेलेल्या बॅँक कर्मचाºयाच्या घरातून लाखोचा ऐवज लंपासपोळा सणानिमित्त सामनेर, ता.पाचोरा येथे मुळ गावी गेलेल्या रामचंद्र भगवान साळुंखे (रा.निवृत्ती नगर, जळगाव) यांच्या स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. साळुंखे हे जिल्ह बॅँकेत नोकरीला आहेत. रविवारी ते पत्नी अनिता यांच्यासह सामनेर येथे गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटात ठेवलेली ४५ हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची पोत, ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २५ हजार रुपये किमतीचे पेंडल, १५ हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा, ५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा तुकडा, ५ हजार रुपये किमतीची चांदीची मुर्ती लांबविण्यात आली आहे.दोन्ही ठिकाणी चोरट्यांची निराशासाळुंखे यांच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आधारसिंग लक्ष्मणसिंग पाटील व महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी भरत पाटील यांच्याकडे वळविला. या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
जळगाव शहरात पुन्हा चार ठिकाणी घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:46 PM
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ च्यावर घरफोड्या झालेल्या आहेत.
ठळक मुद्दे लाखोचा ऐवज लंपास निवृत्ती नगरात तीन तर पटेल नगरात एका ठिकाणी घरफोडी पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान