ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18 - जळगाव शहरात ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या निलेश बापू पाटील (वय 27, रा.नावरे, ता.यावल) या तरुण शेतक:याला चार महिला व तीन पुरुषांनी घरात बोलावून मारहाण करुन त्याच्याजवळील दोन हजार रुपये रोख लुटले तसेच सोनसाखळी व हातातील अंगठय़ा लुटण्याचा प्रय} केल्याची घटना पिंप्राळा, हुडको येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. दीड लाखाची खंडणी दिली नाही तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी या तरुणाला दिली. दरम्यान, याप्रकरणी पवन विजयसिंग बागडे, अजरुन विजयसिंग बागडे, मोहम्मद शाहीद मो.सलीम, शारदा श्रावण मोरे, वंदना श्रावण मोरे, काजल लखन तायडे व एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. शारदा ही फोनच्या माध्यमातून पवनच्या संपर्कात आली होती. त्यानुसार बुधवारी पवन जळगावात आला असता ती त्याला घरी घेऊन गेली. तेथे घरात महिला व पुरुषांनी मारहाण करुन लुटले. यावेळी पवन याने जीव वाचवत त्यांच्या तावडीतून सुटका केली.
गुरुवारी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक राजेश घोळवे, गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, हितेश बागुल व विजय खैरे यांनी या सातही जणांच्या मुसक्या आवळल्या. उपनिरीक्षक प्राची राजूरकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.