याबाबत वृत्त असे की, तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये त्यांना मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (वय ३७, रा. संत मिराबाई पिंप्राळा शिवार) याने अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी केली व ही लाचेची रक्कम किरण सपकाळे याचे सांगण्यावरून होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (२५ रा. सोनवद, ता. धरणगाव) यांच्या मदतीने धरणगाव पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या पाळधी दूरक्षेत्र पंचासमक्ष अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, सहायक फौजदार सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र घुगे, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नासिर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईने येथील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. -
----
फोटो - २४सीडीजे१०