शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर
3
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
4
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
5
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
6
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
7
८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला
8
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
9
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, २ वर्षांपूर्वी लग्न; कुलगाममध्ये शहीद प्रदीप यांची पत्नी गर्भवती
10
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
11
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
12
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
13
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
14
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
15
"ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", 'धर्मवीर २'चा जबरदस्त टीझर
16
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
17
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
18
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
19
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
20
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी

उंबरखेड व धारागिर गावात 12 ठिकाणी घरफोडी

By admin | Published: June 20, 2017 4:03 PM

चोरटय़ांनी घरफोडीत रोख रकमेसह साडेचार लाखांचा ऐवज केला लंपास

ऑनलाईन लोकमत

उंबरखेड,ता.चाळीसगाव, दि.20- चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री उंबरखेड गावातील सहा दुकाने व दोन घरांमध्ये घरफोडी करीत लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. तर एरंडोल तालुक्यातील धारागिर येथे चार घरांमध्ये घरफोडी करीत तीन लाख 10 हजार 390 रुपयांचा ऐवज लंपास केला.
 उंबरखेड बाजारपेठेतील सर्वोदय दूध संकलन केंद्रात दुध उत्पादकांची पेमेंटची रक्कम सुमारे 42 हजार रुपये चोरटय़ांनी लांबविले. त्यानंतर सुमतीलाल कोठारी यांच्या मालकीच्या महावीर किराणा या दुकानातून 800 रुपयांची रोकड व किराणा माल असा 15 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटय़ांनी दुस:या मजल्यावरील माहिरीन मोबाईलचे दुकान फोडून त्यातील 6 मोबाईल आणि रोकड पाच हजार तर दिव्या अॅग्रो या बियाणे व कीटक नाशक दुकानातून   25000 रुपये गायब केले. चोरटय़ांनी शेजारील एका सलूनच्या दुकानात  कुलुपे तोडून आत घुसले मात्र या ठिकाणी पैसे मिळाले नाही. त्यानंतर चोरटय़ांनी योगेश वाणी यांच्या मोबाईल व ङोरोक्स दुकानातून 27 हजारांचा ऐवज लांबविला. त्यानंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा रहिवासी भागाकडे वळविला. त्यात 5 नंबर गल्लीतील योगेश वसंतराव पाटील यांच्या बंद घरात प्रवेश केला. मात्र या ठिकाणी काही मिळाले नाही. त्यानंतर कविता गोसावी यांच्या घरातील 12 हजार रुपये चोरून नेले. बाजारपेठ व रहिवासी वस्तीतील घरफोडीचा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटय़ांनी एरंडोल तालुक्यातील धारागिर गावात सोमवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. चोरटय़ांनी जयदेव धोंडू पाटील, सुनील सुभाष पाटील, सुभाष दयाराम पाटील, संजय सुभाष पाटील यांच्या घरातून तब्बल तीन लाख 10 हजार 390 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.