ऐनपूर, ता.रावेर : कोरोना विषाणू महामारीच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ऐनपूर ग्रामस्थांकडून सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देवून गौरवण्यात आले. माजी सरपंच राजीव पाटील अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास निंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार जामकर, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक महाजन आणि डॉ.संदीपकुमार चौरे, पोलीस पाटिल दीपाली तायडे आणि ऐनपूर ग्रामस्थ उपस्थित होते.या कोरोना योद्ध्यांचा झाला सन्मानडॉ.प्रवीण पाटील, डॉ.सचिन पाटील, डॉ.चंदन पाटील, डॉ.रूपेश पाटील, डॉ.प्रतीक पाटील, डॉ.कमलाकर चौधरी, डॉ.रवींद्र पाटील, डॉ.श्रीराम पाटील, डॉ.अभिजित पाटील, डॉ.संजय पाटील, डॉ.विनायक महाजन, डॉ.संदीप चौरे व डॉ.मोहित महाजन.यावेळी श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग पाटील, जगन्नाथ पाटील, पी.एम.पाटील, गोपाल चोधरी, हरी पाटील, नरेंद्र पाटील, विकास महाजन, सुनील महाजन, आर.टी.महाजन, कैलास पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद अवरमल यांनी केले.
ऐनपूर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 3:29 PM