फोटो आहे ...
जळगाव : विशेष कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यासह सहाय्यक साहित्य वाटप करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष अभिजित राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ॲड. के.एच. ठोंबरे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषद दिव्यांग विभागाचे भरत चौधरी, स्वयंदीप प्रकल्प चाळीसगावच्या संचालिका मीनाक्षी निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापनचे सुभाष सांखला, डॉ. अर्पणा मकासरे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रा एस.पी.गणेशकर उपस्थित होते.
प्रास्ताविक नोडल अधिकारी जी. टी. महाजन यांनी तर सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले. डॉ. अपर्णा मकासरे यांनी आभार मानले. सुवर्णा चव्हाण, शोएब शेख, रेडक्रॉसचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, अन्वर खान, समाधान वाघ यांचे सहकार्य लाभले. विविध हस्तकलाकार व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात जणांचा सन्मान करण्यात आला.