उन्हाळातल्या उन्हाबद्दल तीव्र प्रतिक्रिया बहुसंख्येने किंबहुना प्रत्येक व्यक्ती व्यक्त करीत असते. तेवढय़ाच अधिकाधिक प्रमाणातील विवाह उन्हाळ्यात केले जातात. विवाहाला जाणा:या प्रत्येकाला काही नाचणा:या मंडळीचा अपवाद वगळता विवाह वेळेवर लागेल का? असा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही समाजांनी मनोमन पुढाकार घेऊन प्रश्न सोडविला सुद्धा. त्या समाजातल्या तरुण मुलांनी फारच चांगला आदर्श निर्माण केला. ब:याचशा समाजात लग्न वेळेवर लागत नाही. त्यामुळे ताटकळत बसण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. यापुढची गंमत म्हणजे जेवणंसुद्धा लग्नविधी झाल्यावरच सुरू करतात आणि त्या गोडसं नाव सुद्धा देतात. कुँवारी पंगत देऊ नये. पण जरा वेगळाच अनुभव दोन विवाहांना उपस्थिती देताना येऊन गेला. फैजपूरला लग्नानिमित्ताने गेलो. सोनवणे आणि तायडे परिवारातला हा विवाह सोहळा विवाह सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर धरणगावहून फैजपूरला नवरदेव पोहोचला. मंडपात भोजनावळी सुरू होत्या. पारावरचा नवरदेव आणि विवाहस्थळ तसं बरचं लांब होते. आता बॅण्ड सुरू होणार आणि लग्न चार वाजता लागणार असे वाटू लागले. बॅण्ड सुरू झाला. लहान मुलांनी ताल धरला अन् हळूहळू तरुणांची गाण्यांची फर्माईश वाढू लागली. सारं कसं ङिांगाट होवू लागलं. हळूहळू वरात पुढे सरकू लागली. पंधरा-वीस मिनिटानंतर बॅण्ड आणि वरात अध्र्यावर येऊन पोहोचली. पाच मिनिटानंतर वरात मंडपाच्या काही अंतरावर पोहचलीसुद्धा. हे अंतर पार करण्याची किमया काही लक्षात येईना.. वर पित्याला शोधत होतो. तरुण बेधुंद नाचत होते. वर-पित्यानं नवरदेवाचा घोडा वरातीच्या पुढे घेऊन थेट मंडपाजवळच थांबवला. समजुतदारपणा आणि तरुणांची समजूत यांचा सुरेख संगम साधत वरपित्याने विवाह वेळेवर लावून सा:यांनाच सुखद आनंद दिला. असाच दुसरा विवाह नेमाडे आणि पाटील परिवारातला. जळगावातील रणरणत्या उन्हात सावली शोधणा:या मंडळींना वेळेवर विवाह लागल्याने सुखद गारवा देऊन जाताना आनंदाचा प्रत्यय देखील येत असतो.
वरातीपुढून घोडे
By admin | Published: May 29, 2017 2:00 PM
वीकेण्ड स्पेशलमध्ये अनुभव या सदरात डॉ.मिलींद बागुल यांनी केलेले लिखाण.
जळगावच्या विवाहात सा:या नातेवाईक मंडळीत अर्थात महिलांनी देखील फेटे बांधून वरातीत आपल्या आनंदाला वाट करून देत बॅण्डच्या दोन-चार गाण्यातच नवरदेवाला लग्न मंडपात आणून विवाह वेळेवर लावला. या दोनही विवाह सोहळ्याची वैशिष्ठय़े ही होती की, वेळेवर विवाह लागल्यानंतर मंडपाच्या बाहेर पडताना येणारी मंडळी आवजरून विचारायची अजून लग्नाला किती उशीर आहे? लग्न लागल्याचे समजताच त्यांनाच उशिरा आल्याचा पश्चाताप होत होता. पालकांचा समजूतदारपणा आणि तरुणांची मानसिकता यांची सांगड घालत असताना विवाहामध्ये अनेक तर्क आणि विचार देखील ऐकायला मिळतात. ‘मगं का? लग्न पुन्हा पुन्हा होतं? नाचू द्या? आणि मगं सारं काही मूक संमतीनं सहन करावं लागतं. काही लग्नामध्ये तर सत्कार समारंभाचा भार सुद्धा सहन करावा लागतो. परवा एका लग्नात कहरच झाला. मंगलाष्टके सुरू असतानाच एका महनीय व्यक्तीचा (कुटुंबासही) लग्न मंडपात प्रवेश झाला. मंगलाष्टके थांबविण्यात आली. त्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. त्यापुढचा कहर म्हणजे त्या व्यक्तीला भाषणाचा आग्रह झाला आणि त्यांनी तो आग्रह पूर्ण देखील केला. विवाह सोहळा मंगल आणि मांगल्याचा सोहळा असतो. वरातीमागून येणारा घोडा आता वरातीचा पुढे येऊ लागलाय. समज आणि समाज, बांधिलकी याचा समन्वय साधत असताना लहान मुले, स्त्रिया आणि आपण सा:या मंडळीचा आनंदमयी विचार आपण करू या! आणि लगA वेळेवर लावण्यासाठी आग्रही राहू या.. नाही का.?