याबाबत माहिती अशी की, आकाश पावरा ( २५) हा गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मुंदाणे प्रगणे उत्राण येथे राहत होता. तो एका हॉटेलवर स्वयंपाकीचे काम करत होता. त्यांच्या सोबत पत्नी व पाच वर्षांचा मुलगा राहत होते. आकाशच्या आईला कन्नडगाव सेंधवा मध्यप्रदेश येथे सर्पदंश झाल्याने आईला बघण्यासाठी २५ रोजी सकाळी हे तिघे मुंदाणे येथून निघाले. मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ १५४७ वर जात होते. हे दाम्पत्य कन्नड गावाकडे जात असताना सेंधव्या नजिक एका गतिरोधकावर त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यात आकाश पावरा व त्याचा ५ वर्षीय मुलगा हे जागीच मरण पावले. तर त्याची पत्नी ही गंभीर जखमी असून, सेंधवा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेने मुंदाणे गावावर शोककळा पसरली आहे.
हॉटेल कारागिराचा मुलासह अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:16 AM