लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोनही लाटांमध्ये सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या व एकूण सर्वाधिक रुग्ण असलेल्या जळगाव शहरातील ॲक्टिव्ह केसेस शनिवारी अखेर शून्यावर आल्या. शहरात आता एकही कोरोना रुग्ण नसल्याची सुखदवार्ता शनिवारी सायंकाळी शासकीय अहवालातून समोर आली आहे. सलग २८ दिवस एकही रुग्ण न आढळल्यास शहर कोरोनामुक्त होणार आहे.
शनिवारी जिल्हाभरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. दोन रुग्ण बरे झाले असून यात जळगाव शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. एकमेव रुग्ण बरा झाल्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वाढत असताना कोविडचे मृत्यू थांबण्यासह आता रुग्णसंख्याही थांबल्याने हे सकारात्मक चित्र यातून समोर आले आहे. शनिवारी आरटीपीसीआरचे ४०४ अहवाल आले तर ॲन्टीजनच्या ४३१ चाचण्या झाल्या.
शहरातील एकूण रुग्ण : ३२९६९
बरे झालेले रुग्ण : ३२३९७
मृत्यू ५७२
सक्रिय रुग्ण ०
जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती
सक्रिय रुग्ण ४
लक्षणे असलेले ०१
लक्षणे नसलेले ०३
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारा रुग्ण ०१
अतिदक्षता विभाग : ००
गृहविलगिकरण : ३
आठवड्यात एकही रुग्ण नाही
१९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर : रुग्ण : ००, बरे झालेले : ०७
शहरात कोविड
पहिला रुग्ण : २८ मार्च
पहिला मृत्यू : १ एप्रिल
प्रथमच दिवसभरात शून्य रुग्ण : १ जुलै
सक्रिय रुग्ण प्रथमच शून्यावर : २५ सप्टेंबर