ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - नाडगाव ते वरणगाव दरम्यान रेल्वे रुळाशेजारी दोन मोठे वृक्ष जळत असल्यामुळे सकाळी 8 वाजेच्या सुमारास नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेगाडी वरणगाव रेल्वेस्थानकावर तासभर थांबून होती. रेल्वे रुळाशेजारीच वृक्ष पेटली असल्याचे रेल्वे कर्मचा:यांच्या लक्षात आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र एक्स्प्रेस वरणगाव रेल्वे स्थानकावरच थांबून ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिचा तासभर खोळंबा झाला. त्या दरम्यान रेल्वे फलाटावर पाणी व खाद्य प्रदार्थ उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. झाडाला लागलेली आग रेल्वे कर्मचा:यांनी विझविल्यानंतर गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली.
महाराष्ट्र एक्सप्रेसचा वरणगाव स्थानकावर तासभर खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 3:56 PM