पंचायत समिती गाठून केली चौकशी
भटू पिंजारी यांनी योजनेत घर बांधले नसताना त्यांच्या नावाचा समावेश पाहून त्यांनी पंचायत समितीत जाऊन चौकशी केली असता व ऑनलाइन यादी पहिली असता त्याच्या नावावर घरकुल मंजूर असून, त्याचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर काढलेले दाखविण्यात आले. हा प्रकार त्यांनी प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पंकज पाटील यांना सांगून त्यांच्यासोबत पुन्हा गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सदरील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात पिंजारी यांना घरकुल मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने सदरील घटनेस जबाबदार तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
फोटो निवेदन देताना