चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाघळी येथे अवकाळी पावसामुळे उत्तम जयराम हाडपे यांचे घर गुरुवारी मध्य रात्री दोन वाजेच्या सुमारास घर कोसळले. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घराच्या ढिगाऱ्याखाली त्यांचा मुलगा सापडला होता. पण शेजारी असलेल्या लोकांनी त्यास बाहेर काढण्यासाठी मदत केली.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंगाडे, रासपचे चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख रवींद्र पाटील, जय मल्हार सेनेचे चाळीसगाव तालुकाप्रमुख बापूसाहेब लेणेकर, डॉ.सुभाष निकुंभ, वाघळी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी आदींनी उत्तम हाडपे यांच्या परिवाराची भेट घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा पंचनामा तत्काळ पंचनामा करावा, अशी मागणी संबंधितांनी वाघळी तलाठी यांना दूरध्वनीवरून कळविली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 4:52 PM
वाघळी येथे अवकाळी पावसामुळे उत्तम जयराम हाडपे यांचे घर गुरुवारी मध्य रात्री दोन वाजेच्या सुमारास घर कोसळले.
ठळक मुद्देजीवित हानी नाहीमुलगा बचावला