पारोळा, जि. जळगाव : पारोळा येथे १४ रोजी मध्यरात्री प्रा. आर.बी. नेरकर यांच्या घरी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत ११ तोळे सोने व १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला.प्रा. नेरकर हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या खोलीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. त्या वेळी घरातील ११ तोळे सोने व १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. सकाळी प्रा. नेरकर खालच्या मजल्यावर आले असता हा प्रकार लक्षात आला.
पारोळा येथे प्राध्यापकाच्या घरी चोरी, ११ तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:20 PM