शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घरकूल प्रकरण : पाच जणांच्या जामीन अर्जावर १५ रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:10 PM

देश सोडून न जाण्याची अट, जामीनावर दिवसभर चालला युक्तीवाद

जळगाव/औरंगाबाद : जळगाव घरकूल प्रकरणात आजी- माजी ३५ नगरसेवकांना जामीन मंज़ूर करण्यात आला. आता सुरेशदादा जैन, जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, आणि पी. डी. काळे आदींच्या जामीन अर्जांवर १५ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.घरकुल प्रकरणात नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी उच्च खंडपीठात दिवसभर युक्तीवाद झाला. सायंकाळी सर्व अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर सरकार पक्षाकडून शुक्रवारी युक्तीवाद पूर्ण करण्यात आला़ त्यानंतर जामीनावर निर्णय देऊन ३५ जणांचे जामीन अर्ज अटी-शर्तीवर मंजूर करण्यात आले़ जामीन मंजूर झालेल्या आरोपींनी देश सोडून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट नोटीस’ची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी खंडपीठास केली.मात्र, लता भोईटे या रूग्णालयात असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर १८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.यांनी घेतले अर्ज मागेशिक्षा सुनावल्यापासून रूग्णालयातच असलेले आरोपी कारागृहात जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जामीन अर्जांवर विचार केला जाणार नाही, असे खंडपीठाने खडसावताच मीना वाणी, अलका लढ्ढा, साधना कोगटा, विजय कोल्हे आणि सुधा काळे यांनी त्यांचे जामीन अर्ज गुरूवारी मागे घेतले.यांनी पाहिले कामकाजया प्रकरणात शासनातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण काम पाहत आहेत. त्यांना अ‍ॅड. विजय रवंदळ सहकार्य (असिस्ट टू पीपी) करीत आहेत. अपिलार्थी सुरेशदादा जैन यांच्यातर्फे अ‍ॅड. सत्यजित एस. बोरा, तर इतर अपिलार्थींतर्फे अ‍ॅड. महेश एस. देशमुख, अ‍ॅड. बी. आर. वर्मा, अ‍ॅड. जॉयदीप चॅटर्जी, अ‍ॅड. गिरीश वाणी, अ‍ॅड. आर. आर. मंत्री, अ‍ॅड. एन. एल. चौधरी, अ‍ॅड. किशोर संत, अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ, अ‍ॅड. परेश पाटील, अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, अ‍ॅड. आबासाहेब शिंदे, अ‍ॅड. नीलेश घाणेकर, अ‍ॅड. मुकुल कुलकर्णी, अ‍ॅड. महेश पाटील, अ‍ॅड. विक्रम आर. धोर्डे, अ‍ॅड. अजित बी. काळे आणि अ‍ॅड. अभयसिंह भोसले, अ‍ॅड. विनोद पाटील आदी काम पाहत आहे़अटी-शर्तींवर मिळाले जामीनखंडपीठाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, विजय रामदास वाणी, अजय राम जाधव, चत्रभूज सोमा सोनवणे, कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, देविदास धांडे, दत्तू देवराम कोळी, डिगंबर दलपत पाटील, सुनंदा रमेश चांदेलकर, मिना अमृत मंधान, अशोक रामदास परदेशी, शिवचरण कन्हैय्या ढंढोरे, रेखा चत्रभूज सोनवणे, चुडामण शंकर पाटील, वासुदेव परशराम सोनवणे, इकबाल पीरजादे, मंजुळा धर्मेंद्र कदम, विमल बुधा पाटील, सुभद्राबाई सुरेश नाईक ,पुष्पलता शालिग्राम अत्तरदे, शांताराम चिंधू सपकाळे, लिलाधर नथ्थू सरोदे, अफजलखान रऊफखान पटवे, मुमताजबी हुसैन खान, निर्मला सुर्यकांत भोसले, सरस्वतीबाई रामदास कोळी, अरुण नारायण शिरसाळे, अलका अरविंद राणे, चंद्रकांत शंकर कापसे, डिगंबर दौलत वाणी, भगत रावलमल बालाणी, पांडूरंग रघुनाथ काळे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव