शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जळगाव जि.प.चे अध्यक्ष मुंबईला राहतील तर कामकाज कसे चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:29 PM

उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांचा सवाल

ठळक मुद्देविशेष सभेवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलीगटनेत्यांनी चर्चा करूनच सभा ठरवली

जळगाव : जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेवरून सुरु असलेली भाजपामधील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष जर मुंबईमधून कामकाज चालवित असतील तर सभा रद्द होण्याची नामुष्की ओढवणार असल्याचे जि.प.उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.जिल्हा परिषदेतील निधीच्या नियोजनासाठी गटनेते पोपट भोळे यांनी जि.प. अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर सभा ठरली होती. मात्र ही सभा रद्द करण्याचे कारण काय? हे आपल्याला समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षांच्या दिरंगाईमुळेच निधी खर्च होत नसल्याचा आरोप नंदकुमार महाजन यांनी केला. नियोजनावरून सत्ताधारी पक्षातच फुट पडून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.गटनेत्यांनी चर्चा करूनच सभा ठरवलीजिल्हा परिषदेचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी गटनेते पोपट भोळे, सदस्य मधुकर काटे व सभापती आपल्या दालनात आले होते. गटनेत्यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत अध्यक्षांसोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधत २३ तारीख निश्चित केली होती. सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सभेची तारीख निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.सहीसाठी अध्यक्षांनी मागविला फॅक्सअध्यक्ष हे मुंबईला होते. त्यात अजेंड्यावर सही करण्याच्या अडचणी असल्याने अध्यक्षांना अजेंडा फॅक्स करून त्यावर सही करण्याचे देखील ठरले. नियोजनाचा निधी खर्च वेळेवर होण्यासाठी ही कसरत सुरू असतांना त्यांनी सभा रद्द का केली हे आपल्याला समजले नसल्याचे उपाध्यक्ष महाजन यांनी सांगितले.नियोजन अध्यक्षांमुळे बारगळलेदोन महिन्यांपासून निधी आल्यानंतर देखील नियोजन झाले नाही. त्यात गेल्या महिन्यातच अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली नाही. पण ज्या प्रयोजनासाठी सभा घेतली त्यात नियोजनाचे विषय ठेवले नाही. अध्यक्षांनी विषयच पटलावर ठेवले नाही. त्यामुळे पुन्हा सभा घेण्याची नामुष्की ओढवली असा आरोप देखील उपाध्यक्षांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव