शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

किती दिवस रडणार, प्रसंगाशी संघर्ष करा, जळगावात फुलबासन देवी यांचा महिलांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 7:05 PM

रोटरी मिडटाऊन व लोकमत सखी मंचतर्फे व्याख्यान व महिलांचा गौरव

ठळक मुद्देजळगावात माहेरी आल्या सारखे वाटतेय...११ महिलांपासून दोन लाख महिलांपर्यंतचा प्रवास

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा असून तोच आपल्यात नसल्याने आपण घरापुरत्या मर्यादीत राहतो. आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, असे म्हणत किती दिवस रडत राहणार? जीवनात संघर्ष करा, आलेल्या प्रसंगाशी लढा, असा मौलिक सल्ला महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाºया छत्तीसगढ येथील फुलबासन देवी यादव अर्थात दबंग दीदी यांनी महिलांना दिला.रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊन व लोकमत सखी मंच यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार, १० मार्च रोजी कांताई सभागृहात सायंकाळी महिलांचा गौरव व महिला सशक्तीकरण यावर व्याख्यान आयोजित केले होते, त्या वेळी फुलबासन देवी बोलत होत्या. आपल्या तब्बल ५० मिनिटांच्या व्याख्यानात त्यांनी त्यांच्या जीवनातील चढ-उताराचे गंभीर व लढ्याचे दिवस सांगून उपस्थितांना स्तब्ध केले.या वेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, ज्योती जैन, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मकासरे, सचिव डॉ. उषा शर्मा उपस्थित होते.‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले. संकेत वारुळकर व दर्शना वर्मा यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी व डॉ. अपर्णा मकासरे यांनी केले. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर डॉ. उषा शर्मा यांनी आभार मानले.प्रेरणा गीताने दिली स्फूर्तीभारत माता की जय व जय महाराष्ट्र म्हणत फुलबासन देवी यांनी व्याख्यानास सुरुवात केली. या वेळी ‘जीवन मे कुछ करना है तो, कुछ पाना है तो मन को मारे मत बैठो...’ हे प्रेरणा गीत सादर करून सर्वांमध्ये स्फूर्ती जागविली. या गीताला उपस्थितांनी टाळ््यांची साथ देत चांगलीच दाद दिली.स्त्री अबला नाहीजीवनात काहीही करण्यासाठी एक ध्येय निश्चित करा. स्त्री ही अबला नाही, मात्र आपले मनच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास जागवा, यश हमखास मिळेल, असा मंत्र फुलबासन देवी यांनी दिला. पैशाला महत्त्व नाही तर कर्माला महत्त्व आहे, त्यामुळे कर्म करीत,असाहीसंदेश त्यांनी दिला.बालपणाच्या कटू आठवणींनी अश्रू अनावरछत्तीसगढमधील रांजणगाव या गावी जन्म झालेल्या फुलबासन देवी यांनी बालपणी घरात सर्व भावंडे दोन ते तीन दिवस भुकेलो राहत होतो. जेवण मागितले तर सकाळी देऊ, सकाळी मागितले तर रात्री देऊ असे परिस्थितीमुळे सांगितले जात होते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसायचा. त्या प्रसंगांनी आई-वडीलही दु:खी होत असे. मदत म्हणून मी सात वर्षांची असल्यापासून हॉटेलवर कपबशी धुण्याचे काम करू लागले. तेथे मला वाटले आपण शाळेत जायला हवे व मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. मात्र घरची परिस्थिती नसल्याने वडिलांचा होकार मिळत नव्हता.अन् स्त्री सशक्तीकरणाचा वसा घेतलावयाच्या दहाव्या वर्षीच लग्न झाले, पंधराव्या वर्षी मुलगा झाला. मात्र घरात खायला काही नसल्याने मी मुलासाठी कोणाकडे अन्न मागितले तर लोक दरवाजे लावून घेत व मुलासाठी भीक मागणारी आई आली, असे बोलले जात असे, असे सांगून फुलबासन देवी म्हणाल्या कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना भुकेले पाहू शकत नाही. मात्र या कटू प्रसंगातून माझ्या आई-वडिलांसह मीदेखील गेले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले व या प्रसंगाने उपस्थितांचाही कंठ दाटून आला. मुलाला खाऊ घालत शकत नसल्याचे बोलले ऐकूण मी त्याच वेळी ठरविले, जे काम माणूस करू शकतो, ते मी करणार व स्त्री सशक्तीकरणाचा वसा घेतला.११ महिलांपासून दोन लाख महिलांपर्यंतचा प्रवासस्त्री सशक्तीकरण, समाज परिवर्तन करण्याच्या कामास सुरुवात केल्यानंतर पतीनेही घरातून काढून दिले. त्या वेळी आम्ही ११ महिलांनी मिळून कामास सुरुवात केली. गावात विरोध होऊ लागला, मात्र डगमगलो नाही. कार्य सुरूच ठेवत गावात स्वच्छता, आरोग्य यासाठी काम केले व गावाचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे गावाला हे पटले. गाव जिंकले, आता समाज जिंकायचा हे ठरवून सायकलने गावोगावचा प्रवास सुरू केला व आज १२ हजार समूह, दोन लाख महिला सोबत जोडल्या गेल्याचे देवी यांनी सांगितले. यामुळे २५० दारूचे दुकाने बंद करण्याचे महत्त्वाचे काम करून शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती,महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम करून महिलांना सशक्त बनवित असल्याचा यज्ञ हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.उणे-दुणे काढण्यापेक्षा सत्कार्य कराघरात बसून कोणाचे उणे-दुणे काढण्यापेक्षा बाहेर पडा, काही तरी सत्कार्य करा व आयुष्य असे जगा की आपल्यानंतरही आपली ओळख राहिली पाहिजे, असा संदेश फुलबासन देवी यांनी शेवटी दिला.जळगावात माहेरी आल्या सारखे वाटतेय...जळगावात मिळालेले प्रेम पाहता माहेरी आल्या सारखे वाटते, असे सांगून तुम्ही केव्हाही बोलवा, मी यायला तयार आहे, असे आवाहन त्यांनी जळगावकरांना केले.रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या प्रकल्प प्रमुख डॉ. सुमन लोढा यांनी परिचय करून दिला.या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया कर्तृत्ववान महिला व गटांचा सन्मान करण्यात येणार आहे.सत्कारार्थी (कंसात क्षेत्र)डॉ. बबिता कमलापूरकर (आरोग्य), चेतना खिरवाडकर (व्यवस्थापन), डॉ. महिमा मिश्रा (कला), सुलभा कुलकर्णी (साहित्य), प्रणिता गायकवाड (शैक्षणिक), सरला कोळी (व्यवसाय), सुमन लोखंडे (आरोग्य), कांचन चौधरी (क्रीडा), आम्ही मैत्रिणी ग्रुप ( सामाजिक व आरोग्य), बॉक्स आॅफ हेल्प ग्रुप (सामाजिक).

टॅग्स :Jalgaonजळगाव