मतीन शेखमुक्ताईनगर : सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. भाजपची पक्ष म्हणून भूमिका तर एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील.जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यास पाया रचणाऱ्या आणि भाजपचा गड असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांची पक्षांतर्गत आप्तस्वकीयांकडून झालेली कोंडी, कट कारस्थानाने कथित भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना सोडावे लागलेले मंत्री पद या मुरब्ब नेत्याला ‘हमे तो अपनोने लुटा गैरो मे दम था’ मेरी कस्ती थी डुबी जहा पानी कम था’ अशा अवस्थेत आणून ठेवले आहे. जवळपास सर्वच आरोप व चौकशांमधून बाहेर पडलेले खडसे यांची पक्षांतर्गत होणारी घुसमट आणि त्यांच्या उद्विग्नतेला समर्पकपणे तोंड फोडण्यासाठी तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक ही अंतिम संधी मानली जात आहे. पुराव्यानिशी आरोप करण्यात हातखंडा असलेले खडसे यांनी विधानसभेत शेवटच्या भाषणात आपल्याकडे अनेकांविरोधात पुरावे असल्याचे सूतोवाच केले; अंगावर आला त्याला शिंगावर घेतला असा त्यांचा स्वभाव आहे. परंतु अशी कोणती बाब आहे की खडसे आपला घात करणाऱ्यांवर ठेवणीतील अस्त्र वापरत नाही. दर वेळेस दिल्ली वारी करून खडसे शांत होतात खरे परंतु त्यांची खदखद सतत समोर येत असते आणि नेमकी हीच बाब तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्ष श्रेष्ठींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.शिवसेनेचे आव्हान२०१४ च्या निवडणुकीत मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढत रंगली. एकनाथराव खडसेंविरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील अशी ही लढत होती. एरव्ही दशकापासूनची राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची छुपी युती या निवडणुकीत उघड झाली. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण पाटील यांची अनामत जप्त होण्याइतकी नामुष्की राष्ट्रवादी पक्षाला सहन करावी लागली. निकालाच्या आकडेवारीनंतर राष्ट्रवादीत अस्तित्व गमविल्याची ओरड झाली. आता राष्ट्रवादीला अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.विधानसभेत बंडखोरीचे सावटभाजपकडून विधानसभा उमेदवारीबाबत खडसे अस्वस्थ आहे. मात्र शुक्रवारी रावेर येथे पक्षाच्या मेळाव्यात पक्ष तिकीट देवो अथवा ना देवो जनता आपल्या पाठीशी असा इशारा दिल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. खडसेंचे हे विधान पक्षावर दबाव आहे की बंडखोरीची पूर्वसूचना, हे लवकरच उघड होईल. २५ सप्टेंबर २०१४ ला युती तोडण्याची घोषणा भाजपने खडसे यांच्या तोंडी करवून घेतली आणि ते युतीचे खलनायक बनले युुती तुटल्याने येथून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना विधानसभेत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. तब्बल पाच वेळा विधानसभा निवडून आलेल्या एकनाथराव खडसे यांना सहाव्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी तुल्यबळ लढत दिली होती. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर सभा घेऊन निवडणुकीत रंग भरला होता. येथूनच चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला. चार पंचवार्षिक भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणाºया या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असे स्वरूप प्राप्त झाले. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील पुन्हा विधानसभा लढतील. प्रसंगी सेना भाजप युती झाली आणि परंपरेने ही जागा भाजपकडे असली तर चंद्रकांत पाटील बंडखोरी करतील, असा मत प्रवाह आहे. किंबहुना पाटील मतदारसंघात घेत असलेल्या मेहनतीने हे उघड आहे.तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतन आणि मंथनच्या बाहेर पडल्याचे दिसत नाही. पक्षाची सक्रियता फारशी नाही. मात्र नेत्यांकडून दावे दमदार होत आहेत. काँग्रेस पक्षाने मरगळ झटकली आहे. निवडक पदाधिकारी असले तरी ते लोकांपर्यंत जात आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील कामाला लागली आहे. लोकसभेत मतदारसंघातून त्यांनी २० हजार मतांचा टप्पा पार केला होता.मतदारसंघात तीन पालिका, एक बाजार समिती, दोन पंचायत समित्या व जवळपास तीन चतुर्थांश वि.का. सोसायट्यांवर व ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप पेक्षा शिवसेना सतत निवेदने, आंदोलन व उपक्रम करून मतदारसंघात सक्रिय आहे.राष्ट्रवादीचे निवडणूक कार्यालय वजा पक्ष कार्यालय सुरू झाले आहे, तर काँग्रेसला कायमस्वरूपी कार्यालयाची व कार्यकर्त्यांची वाट पहावी लागत आहे.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपाआमदार एकनाथराव खडसेअॅड. रोहिणी खडसे-खेवलकरअशोक नामदेव कांडेलकरशिवसेना -चंद्रकांत पाटीलकॉँग्रेसउदय पाटील, डॉ. जगदीश पाटील, एस.ए. भोईराष्टÑवादी कॉँगेसअॅड. रवींद्र पाटील,विनोद तराळवंचित बहुजन आघाडीसंतोष बोदळे, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर
अडचणीतून खडसे माग कसा काढणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:24 PM