लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४५० बेड व ९४ व्हेंटिलेटर्स असताना केवळ मनुष्यबळ नसल्याने संपूर्ण बेड व व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याचे गंभीर चित्र आहे. या रुग्णालयात जागा असतानाही, दिवसाला अनेक गंभीर रुग्णांना परत पाठविले जात आहे. पूर्णत: कोविड रुग्णालय करूनही खाटा वापरात येत नसल्याने रुग्णांची हेळसांड कायम आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रोज सरासरी ९०० रुग्ण समोर येत आहेत. यात सरसरी ७०० रुग्ण बरे होत आहे. मात्र, नियमित २०० रुग्णांचा भार यंत्रणेवर पडत आहे. यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही २२०० पेक्षा अधिक झाली आहे. यात अनेक रुग्णांना थेट अतिदक्षता विभागाचे उपचार आवश्यक असतात, मात्र ते मिळतच नसल्याची गंभीर स्थिती गेल्या काही दिवसांपासून समोर आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुन्हा सोमवारी बैठक घेऊन बेड मॅनेजमेंटचा आढावा घेतला.
जीएमसीतील एकूण बेड : ४५०
वापरात असलेले बेड : १९४
फिरून फिरून महिला अखेर कोसळली
शिवाजी नगरातील एका गर्भवती महिलेला स्थानिक महापालिका रुग्णालयात उपचार न मिळाल्याने नातेवाईक महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले हेाते. या ठिकाणी कोविड असल्याने महिलेला दाखल करता आले नाही, उपचारांसाठी होणारी फिरफिर यामुळे महिला चक्कर येऊन खाली कोसळल्यानंतर नातेवाईक जवळ बसून रडत होते. यात महिलेचा लहान मुलगाही बाजूला बसला होता. अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे हा विषय गेल्यानंतर महिलेला राजर्षी शाहू महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फोटो आहे.