जळगाव : जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या स्वतंत्र सपंर्क कार्यालय असले तरी निवडणुकीच्या काळात सर्व प्रचाराचे कामकाज त्यांचे गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयातूनच चालले. गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच सुरेश भोळे यांनी लीड घेतल्यामुळे जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली होती. तर दुसरीकडे युतीत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात मात्र एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस दिसून आले.शिवतीर्थ मैदानासमोरील जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना निकालाचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी मोठा स्क्रीन उभारण्यात आला होता. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जळगावसह राज्यभराचा निकाला ऐकतांना दिसून आले. यावेळी काही कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणाहून जसजशी सुरेश भोळेंना मिळालेल्या मतांची माहिती देत होते. तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसून येत होता.या ठिकाणी सुरेश भोळेचेंही आगमन होताच कार्यकर्त्यांचा उत्साहात अधिकच भर पडली होती. अनेकांनी त्यांना निकालाआधीच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर आमदार कार्यकर्त्यांसोबत निकालाचे अपडेट जाणून घेत होते.शिवसेनेच्या कार्यालयात एकही कार्यकर्ता नाहीएकीकडे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरु असतांना दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोलाणी मार्केटातील कार्यालयात एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. कार्यालयाच्या बाहेर कुठलाही गैरप्रकार उद्भऊ होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जीएम फाऊंडेशनमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:22 PM