रात्री र्पयत राहणार शो-रुम सुरु : उद्यार्पयत नोंदणी शक्य
जळगाव : बीएस-4च्या निकषांची पूर्तता न करणा:या वाहनांवर बंदी आल्याने त्यांच्यावर तब्बल 20 हजारांर्पयत भरघोस सूट देत त्यांची सवलतीच्या दरात विक्री केली जात असल्याने शुक्रवारी जळगावातील शोरुमध्ये खरेदीदारांची प्रचंड गर्दी उसळली होती. यामुळे शोरुमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांना तैनात केले. ग्राहकांची गर्दी पाहता रात्रीर्पयत शोरुम सुरु ठेवण्यात येणार आहे.
भारत स्टेज-3 (बीएस-3) इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय दिला. त्यामुळे 1 एप्रिलपासून बीएस-4 इंजिन असलेलीच वाहने विक्री करता येणार असल्याने वाहन कंपन्यांनी सध्या उपलब्ध असलेली बीएस-3 वाहनांची विक्री करण्यासाठी त्यांच्यावर मोठी सवलत जाहीर केली. कंपन्यांकडून ही सवलत जाहीर होताच वाहने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
कधी नव्हे एवढी सवलत
एरव्ही सणाला विविध कंपन्या वाहनांवर वेगवेगळ्य़ा सवलती देत असतात. मात्र त्याही ठराविक मर्यादेर्पयत असतात. मात्र ही वाहने खपविण्यासाठी या सवलतीत तर थेट तीन हजार ते 20 हजारार्पयत भरघोस लाभ ग्राहकांना दिला जात आहे.
अन् शोरुम झाले फुल्ल
या सवलतीची विविध माध्यमाद्वारे माहिती होताच नागरिकांनी वाहनांच्या दालनांकडे धाव घेतली. बघता बघता दुपार्पयत एवढी गर्दी झाली की, तेथे पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक ठिकाणी तर सुरक्षा रक्षकांना तैनात करून नागरिकांना बाहेर काढण्यात येत होते व रांगा लावण्याची विनंती करण्यात येत होती.
हजारो नवी वाहने उपलब्ध
1 एप्रिलपासून बीएस-3 इंजिन असलेली वाहने विक्री करता येणार नाही, त्यामुळे कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे, हे टाळण्यासाठी अशी हजारो नवी वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
31 र्पयतचे बिलिंग, उद्या नोंदणी शक्य
1 एप्रिलपासून अशा वाहनांची नोंदणीदेखील बंद होणार असली तरी 30 आणि 31 मार्च रोजी ज्या वाहनांचे बिलिंग होईल, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे असतील त्या वाहनांची नोंदणी 1 एप्रिल रोजी करता येणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.