जळगाव : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण घटत असून शहरात सोमवारी केवळ एका बाधिताची नोंद झाली आहे. तर १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटून १०१ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागात ५ बाधित आळून आले आहेत.
जिल्ह्यातील एकत्रित पॉझिटिव्हिटी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात जळगाव शहरातील बाधितांची संख्याही कमी झाली आहे. शहरासह जिल्हाभरात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यूची नोंद नाही. कोरोनाचे गांभिर्यही कमी होत असले तरी नियमांमध्ये नागरिकांनी कुठेही शिथिलता आणू नये, असे आवाहनही आरेाग्य विभागाकडून केले जात आहे.
सर्वच पातळ्यांवर जिल्हा ग्रीन झोनमध्ये
आरोग्य विभागाने आठवड्याचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात कोरोनाच्या बाबती सर्वच पातळ्यांवर जिल्ह्याची स्थिती ही राज्यापेक्षा उत्तम असून सर्वच पातळ्यांवर जिल्हा ग्रीन झोन आला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदरही राज्याच्या दरापेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे. १९ जून पर्यंतचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अशी आहे स्थिती
जळगाव कंसात राज्याची स्थिती
रिकव्हरी रेट ९६.५३, (९५.७६ टक्के)
मृत्यू दर : १.८८ (१.९७ टक्के)
दर दहा लाखांमागे बाधित २२३२५ (४८१२७)
एकत्रित पॉझिटिव्हिटी ८.८७ (१६ टक्के)
साप्ताहिक रुग्णवाढ ०.२३ (१.११ टक्के)