वर्ष - किमान तापमानाची सरासरी
२०१६ - १३
२०१७ - १४
२०१८ - १६
२०१९ - १७
२०२० - १७
समुद्राच्या तापमानात वाढ
हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अक्षांशावर व ८२ रेखांशवर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.
पाऊस वाढला, थंडी गायब
दोन वर्षात जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही तब्बल १३२ इतकी आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही नेहमी ९८ टक्के इतकी असते. मात्र, गेल्या वर्षात ही सरासरी तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे खरीप हंमाम पूर्णपणे वाया गेला आहे. तर थंडीचा जोर कमी होत असल्याने रब्बीच्या हंगामावरदेखील परिणाम होत आहे. हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत असून, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.
एकाच दिवसात ७ अंशाची वाढ
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झालेली दिसून येत आहे. गुरुवारी १२ अंशावर असलेले किमान तापमान शुक्रवारी १९ अंशापर्यंत पोहोचले आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ७ अंशाची वाढ झाली आहे. शुक्रवारी वातावरणात मोठा बदल झाल्यामुळे दिवसभर शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
कोट..
हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित घडण्याचीही शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे. यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. अजून आठवडाभर या वादळाचा परिणाम राहणार असल्याने थंडी गायबच राहणार आहे.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा