जळगाव : सतत होणा-या वादातून पत्नीनेच पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पिंप्राळ्यातील भोईवाड्यात घडली आहे. बाळू धोंडू भोई (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून पत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा भोईवाड्यात राहणारे बाळू धोंडू भोई व पत्नी निर्मला यांच्यात सतत वाद होते. गुरुवारी रात्रीही मुलांसमोरच दोघांमध्ये वाद झाला.त्यातून पत्नी निर्मला हिने बाळू यांच्यावर चाकू हल्ला केला. नेहमीचेच भांडण असल्याने शेजारी व नातेवाईकही त्यांना कंटाळले होते.जखमी अवस्थेत रात्रभर घरातचपत्नीने चाकूने भोसकल्यानंतर बाळू गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असतानांही त्याला दवाखान्यात हलविले नाही. दुसºया दिवशी शुक्रवारी सकाळी बाळूचा भाऊ राजू यांना रात्रीच्या वादाची चाहूल लागली. गंभीर जखमी झालेल्या भावाला त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी ९.१५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गुरुवारी घटना घडल्यानंतर शुक्रवारी बाळू याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही एमएलसी अहवाल पोलिसांकडे गेला नाही किंवा पत्नी व अन्य नातेवाईकांनीही घटना पोलिसांना कळविली नाही. त्यामुळे शनिवारी या प्रकरणात थेट खुनाचाच गुन्हा दाखल झाला.उपअधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी बाळूचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व विनोद शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात मृत बाळू याच्या भावांचे जबाब नोंदविला. त्यानंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
जळगाव शहरात पत्नीनेच केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:13 PM
सतत होणा-या वादातून पत्नीनेच पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पिंप्राळ्यातील भोईवाड्यात घडली आहे. बाळू धोंडू भोई (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून पत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देपिंप्राळ्यातील घटना चाकू हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी झाला मृत्यूपत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे