वासेफ पटेल
भुसावळ, जि. जळगाव : सामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस १ एप्रिलपासून पुन्हा सुरु होणार आहे. या गाडीला म्हसावद ता. जळगाव येथे थांबा देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या गाड्यांना थांबा देण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमोल्डिंगचे काम २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान हाती घेण्यात आले होते. यासाठी भुसावळ- पुणे हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिन्यापासून बंद होती. ही गाडी आता एक एप्रिलपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या गाडीला म्हसावद रेल्वे स्थानकावर दोन तारखेपासून थांबा देण्यात येणार आहे.
संपर्क क्रांतीला थांबा
नांदेड निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस या साप्ताहिक गाडीला ४ एप्रिलपासून भुसावळ स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. गाडी जळगावनंतर थेट भोपाळ येथे थांबत होती.
दुरांतोला बडनेराला थांबा
मुंबई- नागपूर, नागपूर- मुंबई दुरांतो एक्सप्रेसला १ एप्रिल पासून बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.