जळगाव : मालेगावात दोन फिजिशियनवर सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे, जळगावात मात्र, ११९ डॉक्टर, १३ फिजिशियन्स असतानाही रुग्णांचा मृत्यूदर थांबत नाही़़ ‘आय वॉज शॉक्ड’ असे सांगत रुग्णांना बरे करण्याची डॉक्टरांमध्ये इच्छाशक्तीच नाही, असा ठपका आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांवर ठेवला़ जे डॉक्टर येत नसतील त्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशा कडक सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या़ वाढलेल्या मृत्यूदरावरून मंत्री टोपे यांनी सव्वा तास कोविड रुग्णालयात यंत्रणेची झाडाझडती घेतली. जळगावातील परिस्थितीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे़आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी नियोजन भवनातील बैठकीनंतर अर्धा तासाच्या अंतराने सव्वा चार वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली़ त्यांनी सुरुवातीलाच आपत्कालीन विभागातील परिचारिकांसोबत संवाद साधला़ यासह त्याच कॅबीनमध्ये आॅक्सिजनसंदर्भात माहिती घेतली़ त्यानंतर अधिष्ठातांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. मृत्यूदर कसा वाढला, तो आटोक्यात कसा येईल, याच विषयावर त्यांनी अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्यासह डॉक्टरांना चांगले धारेवर धरले़ डॉक्टर जर तपासणीला नियमित जात असतील तर रुग्ण दगावणारच नाही, असेही ते म्हणाले़
रुग्णाने फोनवर केलीआॅक्सिजनची मागणीकोविड रुग्णालयातील नेमकी परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी मंत्री टोपे यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना जे स्थिर रुग्ण असतील त्यांना फोन करण्यास सांगितले़ त्यांनी सर्व रुग्णांशी संवाद साधत ह्य तुम्ही कसे आहात, जेवण वेळेवर मिळतेय की नाही, डॉक्टर तपासणीला किती वेळा येतात असे काही प्रश्न त्यांनी रुग्णांना विचारले, जवळपास सर्वच रुग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, एका रुग्णाला मात्र, धाप लागत असल्याने मला आॅक्सिजन हवे आहे, अशी मागणी या रुग्णाने आरोग्यमंत्र्यांकडे केली़ त्यावेळी त्याला आॅक्सिजन हवे आहे, एवढे आरोग्य मंत्र्यांनी यंत्रणेला सांगितले़ दरम्यान, एका रुग्णाला दाखल होऊन १७ दिवस झाल्याचे समजताच त्यांनी लागलीच या रुग्णाचा केसपेपर मागवून माहिती करून घेतली़ लक्षणे नसलेल्या रुग्णांना सतरा सतरा दिवस ठेवून जागा का अडविली जाते? असा प्रश्न त्यांनी केला.
निदान होत नसल्याने मृत्यू वाढलेरुग्ण दुर्लक्ष करीत असतील, घाबरत असतील मात्र, आपणही त्यांचे निदान करण्यात त्यांचे सर्वेक्षण करण्यात कमी पडत आहोत़ एकदम गंभिरावस्थेत रुग्ण येतात़ ते एकटे जात नाहीत, तर अनेकांना बाधा सोडून जातात, त्यामुळे कुठल्याही स्थितीत हायरिस्क लोकांचे सर्वेक्षण प्राथमिक स्तरावर व्हायलाच पाहिजे, अशा कडक सूचना मंत्री टोपे यांनी दिल्या
कंटेमेण्ट झोन दहादिवसाचा करण्यावर चर्चाकुठल्याही भागात शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस तो भाग प्रतिबंधित क्षेत्र असतो़ त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा अडकलेली असते, अश स्थितीत हे दिवस कमी करावेत, अशी मागणी आयुक्तांसह, जिल्हाधिकाºयांनी केली़ यावर तत्काळ टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ़ हर्षवर्धन तथा आयसीएमआरच्या अधिकाºयांशी चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी केली़ किमान चौदा दिवस किंवा त्यापेक्षा अधिक हे प्रतिबंधित क्षेत्र असावे, असा मुद्दा त्यांनी मांडला़
बैठकीच्या शेवटी विश्वाससव्वा तास सर्व उहापोह झाल्यानंतर अखेर बैठकीच्या शेवटी औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ भाऊराव नाखले यांना मृत्यूदर वाढीची कारणे मंत्री टोपे यांनी विचारली़ यावर त्यांनी आकडेवारीनुसार स्पष्टीकरण दिले़ शिवाय अनेकांना अनेक व्याधी होत्या, असेही त्यांनी सांगितले़ यावर जळगावचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे़ त्यामुळे तो नियंत्रित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले़ यावर मृत्यूदरही व रुग्णसंख्याही लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी बैठकीत व्यक्त केला़
साडे आठ तासात वाढीव मृत्यूदरावरच झडली चर्चाआरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे जळगावात सकाळी दहा वाजेच्या सुमारास अजिंठा विश्रामगृहात आगमन झाले़ या ठिकाणीही त्यांना काही पदाधिकारी भेटले व त्यांनी मृत्यूदराचाच विषय मांडला़ माध्यमांशी बोलतानाही त्यांनी मृत्यूदर शंभर टक्के कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला़मृत्यूदर कमी करण्यासाठीच्या उपायायोजनांसाठी त्यांनी तब्बल सव्वा अकरा ते दोन अशी तीन तास बैठक घेतली़ यानंतर अर्धा तास त्यांनी याच विषयावर पत्रकांशी संवाद साधला़ यानंतर सव्वा चार ते साडेपाच वाजेदरम्यान त्यांनी मृत्यूदराच्या विषयावरूनच डॉक्टरांची झाडाझडती घेतली़ असा त्यांनी दहा ते साडेपाच वाजेदरम्यानही मृत्यूदराचाच विषय होता. यावरून वरिष्ठ पातळीवर जळगावचा वाढलेला मृत्यूदर हा गांभिर्याने घेतला जात असल्याचे स्पष्ट होते़सध्या खासगी लॅबकडून कोरोना तपासणीसाठी आवाजावी दर आकरण्यात येत आहेत, शिवाय रुग्णांची लूट होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरच हे दर १५०० शे १८०० रुपयांपर्यंत आणू असेही टोपे यांनी सांगितले़ सर्व अधिकार दिले असल्याने आता प्रशासनाची चूक मान्य केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे़
विद्युत दाहिनी कार्यान्वित कराकोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहरात महानगरपालिकेने तत्काळ विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले. शहरात विद्युत दाहिनी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहे. त्यातच कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक तयार होत नाही. यामुळे प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले. ही बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्याने या पार्श्वभूमीवर विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर टोपे यांनी हे आदेश दिले.अन्य व्याधी म्हणून रुग्णाला मरू द्यायचे का?एवढा मृत्यूदर का असा प्रश्न टोपे यांनी विचारल्यानंतर अधिष्ठाता डॉ़ खैरे यांनी आकडेवारी सांगितली़ त्यात ९ रुग्ण हे मृतावस्थेत आलेले होते़ ९० रुग्णांना इतर व्याधी होत्या़ यावर संताप व्यक्त करत अन्य व्याधी असल्याने रुग्णांना मरू द्यायचे का या शब्दात टोपे यांनी संताप व्यक्त करीत सुधारणा करा, अन्यथा प्रशासकीय पातळीवर मोठे यंत्रणेचे मोठे आॅपरेशन होणार आहे,असा इशारा दिला. डॉ़ खैरे यांनी नेतृत्व अधिक प्रभावी करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या़डॉक्टरांकडे अपडेट नाहीसध्या किती डॉक्टर कर्तव्यावर आहेत व किती डॉक्टरांची आवश्यकता आहे़ याबाबत मंत्री टोपे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरांना विचारणा केली मात्र, आपण बघून सांगतो असे उत्तर संबधित डॉक्टरांकडून आल्यानंतर ह्यआपण कोरोनाच्या ६८ व्या दिवशी ही अशी उत्तरे देत असू तर कसे होणार आपल्याकडे सर्व अपडेट व सर्व कागद तयार असावेत, अशा शब्दात त्यांनी यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली़डॉक्टरांच्या यादीवरून संभ्रमसद्या किती डॉक्टर्स आहेत, या मंत्री टोपे यांच्या प्रश्नावर अधिष्ठाता डॉ़ खैरे यांनी ११९ उत्तर दिले़ मात्र, तत्काळ जिल्हाधिकारी डॉ़ ढाकणे यांनी त्यांना थांबवत ह्यतुम्ही मला १४६ डॉक्टरांची यादी दिली होती त्यामुळे ११९ की १४६ असा प्रतिप्रश्न अधिष्ठाता डॉ़ खैरे यांना केला़ यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली होती़आयएमएकडे भीक मागावी लागतेयजालना, बीड, परभणी या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्या ठिकाणी केवळ सामान्य रुग्णालय आहे़ मालेगावचा दोन तर नंदुरबारचा केवळ एका फिजिशनवर कारभार नियंत्रणात आहे़ जळगावात एवढी यंत्रणा असतानाही, आयएमएकडे प्रशासनाला भीक मागावी लागतेय, अशा तीव्र भावना टोपे यांनी व्यक्त केल्या़ आयएमएची सेवा अधिग्रहीत रुग्णालयात द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.समन्वयाचा अभावशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात समन्वयाचा अभाव असल्याचा मुद्दा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यावेळी मांडला़ यामुळे आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे ते म्हणाले़आम्हाला कोरोनाच होऊ शकत नाही एका समाजाचा दावाशहरातील एका भागातील एका समाजातर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून कोरोनाच्या चाचण्या या सर्व चुकीच्या आहेत़ आमच्या समाजात कोणाला कोरोना होऊच शकत नाही, असा दावा या निवेदनात या समाजाने केला आहे़ हे निवेदन जिल्हाधिकाºयांनी तत्काळ कोविड रुग्णालय प्रशासनाकडे पाठविले आहे़ अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी आरोग्य मंत्र्यांना दिली़अधिकाºयांच्या व्यथा... खर्च करा सांगितले जाते मात्र, चौकशीलाही तयार राहण्याचा इशारा दिला जातो़ अहवालांसाठी पैसे खर्च केले़ पाचशे रुपये खिशातून गेले तरी चालतील तरी आम्ही केले़ वरिष्ठ पातळीवरून थोडी लवचिकता हवी, असा मुद्दा अधिकाºयांनी मांडला़ तपासणीला गेल्यानंतर लोक घरात येऊ देत